आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात पहाटे गुंडाचा धिंगाणा:कोरेगाव पार्क परिसरात रस्त्यावर गोळीबार; 6 जणांवर गुन्हा दाखल

पुणेएका दिवसापूर्वी
  • कॉपी लिंक
पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याची माहिती - Divya Marathi
पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याची माहिती

पुणे शहरातील उच्चभ्रु परिसर समजल्या जाणाऱ्या काेरेगाव पार्क परिसरात जर्मन बेकरी जवळ आज पहाटे वाढदिवस साजरा करुन जात असलेल्या दाेन गटात भर रस्त्यावर तुफान राडा झाला. त्यानंतर एकमेकांवर भररस्त्यात गाेळीबार केला गेल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी काेरेगाव पार्क पोलिस ठाण्यात सहा आराेपींयवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूर्ववैमनस्यातून सदर हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काेरेगाव पार्क परिसरातील एका उच्चभ्रु हाॅटेलमध्ये मित्रांसाेबत वाढदिवस साजरा करुन एक गट घरी परतत असताना घटना घडली आहे. याप्रकरणी इमरान हमीद शेख (वय-30,रा.बंडगार्डन,) यांनी काेरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सागर काेळनट्टी (वय-36) या सराईत गुन्हेगारास ठार मारण्याचे उद्देशाने दुसऱ्या गटाने फुटपाथवर पडलेले पेव्हर ब्लाॅकने त्यास जबर मारहाण करुन गंभीर जख‌मी करण्यात आले.

या घटनेत ताे जखमी झाला असून त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी आराेपी साेन्या दाेडमणी, नितीन महस्के, राेहन निगडे, धार आज्यासह एकूण सहा जणां विराेधात पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.तक्रारदार इम्रान शेख हे त्यांच्या काही मित्रांसाेबत काेरेगाव परिसरातील हाॅटेल राॅक वाॅटर येथे मित्रांसाेबत वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी एकत्र जमले हाेते. पार्टी संपल्यानंतर ते दुचाकीने परतत असताना पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पूर्ववैमनस्यातून सागर काेळनटी याचेवर हल्ला करण्यात आला.

घटनेच्या वेळी साेन्या दाेडमणी या गुंडाने त्याच्या जवळील कमरेस लावलेले पिस्तुल बाहेर काढून थेट हवेत गाेळीबार केला. रस्त्यावर वाहतूक सुरू असताना संबंधित प्रकार घडून आल्याने खळबळ उडाली आहे.याबाबत पुढील तपास काेरेगाव पार्क पोलिस करत आहे.

बातम्या आणखी आहेत...