आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांची टीका:खा. अमोल कोल्हे केवळ कामाचे श्रेय घेतात

पुणे9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरूरचे खासदार अमोल कोल्हे काम करत नाहीत, कामाची जबाबदारी घेत नाहीत आणि संबंधित काम झाल्यानंतर केवळ श्रेय घेतात, अशी टीका केंद्रीय जलशक्ती व अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी गुरुवारी केली. कोणी भाजपमध्ये येण्यास इच्छुक असतील तर त्यांचे स्वागतच करू, असेही पटेल यांनी या वेळी सांगितले. सांसद प्रवास योजनेंतर्गत शिरूर लोकसभा मतदारसंघाचा दौरा केल्यानंतर पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री पटेल बोलत होते. ते म्हणाले, ‘शिरूर मतदारसंघात भाजपचा विजय निश्चित आहे व स्थानिक नागरिकांचीदेखील तयारी आहे. त्याकरता संघटनात्मक पातळीवर कामे सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...