आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसब्यातील कार्यकर्त्यांची निराशा झटकण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू:खा. गिरीश बापट, हेमंत रासनेंची भेट

पुणे19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी घेतली खा. गिरीश बापट, हेमंत रासनेंची भेट

कसबा विधानसभा पोटनिवडणूक निकालानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार गिरीश बापट व भाजपा-शिवसेना महायुतीचे पराभूत उमेदवार हेमंत रासने यांची भेट घेतली. त्यांनी खा. बापट तब्येतीची विचारपूस केली. भाजप सध्या निराश झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी हेमंत रासने यांच्या भेटीत मंत्री पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून पुन्हा जोमाने कामाला लागण्याची सूचना केली.

कसबा पोटनिवडणुकीत महायुतीचे हेमंत रासने यांचा अनपेक्षित पराभव झाला. या पराभवानंतर कार्यकर्ते निराश झाले आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हेमंत रासने यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान उपस्थितीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पाटील म्हणाले की, भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पोट निवडणुकीत भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी कठोर परिश्रम घेतले. संघर्षाच्या बळावरच आपण अनेक आव्हानांचा अतिशय समर्थपणे पेलली आहेत. पक्ष सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे खचून न जाता सर्वांनी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागावे, आगामी काळात विजय आपलाच आहे, असा विश्वास दिला.

बातम्या आणखी आहेत...