आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसबा निवडणूक:आजारी खा. बापटांचा आ. रवींद्र धंगेकरांनी घेतला आर्शिवाद

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी शुक्रवारी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची भेट घेवून आर्शिवाद घेतला. धंगेकरांनी महात्मा फुले संग्रहालय येथे येत बापट यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. धंगेकर म्हणाले की, ‘खासदार गिरीश बापट यांची पोटनिवडणुकीच्या वेळेला भेट घेतली असती तर भाजपने बापटांवर संशय घेतला असता. त्यांनी कधी कुरघोडीचे राजकारण केले नाही.’ ‘धंगेकर, तुला अडचण येईल तेव्हा मला सांग, मी मदत करेन,’ असे खासदार गिरीश बापट यांनी म्हटले. धंगेकर म्हणाले, संधीचे साेने करणारा मी कार्यकर्ता आहे. आयुष्यात दरराेज नवीन आव्हानांना समाेरे जाण्याची ताकद मला मिळते. दुचाकीवर फिरणाराच धंगेकर पाहिजे : आतापर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची पावती म्हणून त्यास कसब्यातील मतदारांनी धंगेकरांना संधी दिली. परंतु आम्हाला आमदार रवी धंगेकर नकाे, तर एक मार्चपर्यंत दुचाकीवर फिरणारा धंगेकरच पाहिजे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी म्हटले.

बातम्या आणखी आहेत...