आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने पुणे जिल्ह्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे मोठी कारवाई केली आहे. 450 कोटींच्या कर्ज घोटाळा प्रकरणात ईडीने मंगळवारी ही कारवाई केली आहे.
सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी, पिंपरी-चिंचवडमधील पिंपरी आणि काळेवाडी फाटा परिसरात चार ठिकाणी, पुण्यातील औंधमध्ये एका ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. सेवा विकास बँकेने 124 बनावट प्रस्तावांद्वारे जवळपास 430 कोटींचे कर्ज वितरीत केले होते. याचप्रकरणी ईडीने ही छापेमारी टाकली आहे.
नियमबाह्य पद्धतीने कर्ज
या छापेमारीनंतर समोर आलेली माहिती अशी की, यात अनेक व्यक्ती व संस्थांना नियमबाह्य पद्धतीने 430 कोटींचे कर्ज वितरित करण्यात आले. ज्या व्यक्तींची कर्ज मिळण्याची पात्रता नव्हती, त्यांना कर्ज दिले गेले. कर्ज देताना परतफेडीची क्षमता व अन्य निकष तपासण्यात आलेले नाही, असा आरोप अमर मूलचंदानी यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
यांच्यावर छापे
अमर मूलचंदानी यांचे पिंपरी आणि औंध येथे राहणारे दोन नातेवाईक, त्यांचा पीए आणि पिंपरीत राहणारा एक कर्मचारी, काळेवाडी फाटा येथील सोसायटीत राहणारे दोन उद्योगपती आणि महापालिका कंत्राटदार असलेला भाऊ यांच्या घरांवर ईडीने छापे टाकले आहेत.
याआधीही ईडीची छापेमारी
याआधी 3 एप्रिलला पुण्यात ईडीने छापा टाकला होता. माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचनालयने पुण्यात ही कारवाई केली आहे. हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित पुण्यातील व्यावसायिकांच्या घरी ही कारवाई करण्यात येत आहे. व्यावसायिक विवेक गव्हाणे, सी.ए. जयेश दुधेडीया आणि वादग्रस्त ब्रिक्स कंपनीचे संचालक चंद्रकांत गायकवाड यांच्यावर ईडीने छापेमारी केली
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.