आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईडीची कारवाई:अविनाश भोसले यांच्यावर ईडीची पुन्हा एकदा कारवाई, चार कोटींची संपत्ती केली जप्त

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुणे येथील एका जमीनीवर अविनाश भोसले यांनी बांधकाम केले आहे, जी जमीन सरकारी होती.

पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले यांची सुमारे 4 कोटी रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) जप्त करण्यात आली आहे. ABIL अर्थात अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीची ही जमीन आहे. त्यावर सुरु असणारे बांधकाम बेकायदेशीर असल्याच्या प्रकरणी ईडीकडून चौकशी केली जात आहे.

गेल्या काही महिन्यांपासून उद्योजक अविनाश भोसले आणि त्यांचा मुलगा अमित भोसले यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. गेल्या महिन्यात त्यांची तब्बल 5 तास चौकशी करण्यात आली होती. आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये ही चौकशी सुरु आहे. भोसले यांनी बेकायदा पद्धतीने काळ्या पैशांचा व्यवहार केला असल्याचा संशय ईडीला आहे.

का केली जातेय कारवाई ?
पुणे येथील एका जमीनीवर अविनाश भोसले यांनी बांधकाम केले आहे, जी जमीन सरकारी होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी ईडीकडूनही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीकडून त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. ही जमीन पुण्यातील गणेशखिंड रोडवरील रेंज हिल कॉर्नरमधील प्लॉन नंबर 2, यशवंत घाडगे नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेत आहे.

अविनाश भोसले कोण?
अविनाश भोसले हे एक प्रसिद्ध उद्योगपती आहेत. गरीबीतून सुरुवात करून त्यांनी आपले साम्राज्य उभे करणारे उद्योगपती म्हणून अविनाश भोसलेंची ओळख आहे. त्यांनी आपली कारकीर्द एक रिक्षावाला म्हणून सुरू केली होती. दरम्यान भोसलेंनी काही वर्षातच कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमवली आहे. एबीआयएल या ग्रुपचे ते मालक आहेत. ते मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील आहेत.

बातम्या आणखी आहेत...