आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागतिक स्तरावरील पुलोत्सव कार्यक्रम यंदा साजरा केला जाणार आहे. राज्यातील सर्व शहरात हा उपक्रम साजरा व्हावा यासाठी विविध जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडून प्रयत्न करण्यात येणार आहे. असे मत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
याप्रसंगी महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार, सहसंयोजक सुवर्णा भांबुरकर आणि नयनीश देशपांडे उपस्थित होते.
काय म्हणाले चित्राव?
चित्राव म्हणाले, ग्लोबल पुलोत्सव आता जगभरातील पु.ल. प्रेमी समोर सादर होणार आहे.'आशय सांस्कृतिक' च्या वतीने व ' पु. ल. परिवार ' च्या सहयोगाने गेली 20 वर्ष पुलोत्सवाचे आयोजन केले जाते. हा महोत्सव 'ग्लोबल पुलोत्सव झाला असून आज पुलंच्या जन्मदिनी भारतातील सुमारे 23 शहरांत आणि 5 खंडामधील महत्त्वाच्या शहरांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
पुलोत्सव म्हणजे अभूतपूर्व योग
पुलोत्सव म्हणजे जगभरातील मराठी मनांचा केवळ आनंदसोहळा नसून साहित्य विश्वातील एक अभूतपूर्व योग आहे. पुलंनी आपल्या अष्टपैलू गुणांनी स्वतः तर कलांचा आस्वाद घेतलाच... पण अनंत हस्तांनी तो आनंद द्विगुणित करून रसिकांवर त्याची उधळण केली. चित्रपट, नाटक, संगीत, साहित्य व अन्य कलांचा अभिजात आविष्कार म्हणजे पुलोत्सव.पु. ल. जेव्हा 80 वर्षांचे झाले, तेव्हा पुण्यात या निमित्ताने 'बहुरुपी पु.ल.' या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते 8 नोव्हेंबर 1999. दुर्दैवाने यानंतर पुलंचे निधन झाले. पुलंना खऱ्या अर्थी श्रध्दांजली अर्पण करायची असेल तर त्यांचे बहुरुपित्व परावर्तित करणाऱ्या 'पुलोत्सव' सुरु करण्याची परवानगी आम्ही सुनीताबाईकडे मागितली. त्यामुळे 'पुलोत्सव' गेली 20 वर्षे पुण्यात चालू आहे.
असे आहे पुलोत्सवाचे वैशिष्ठ्ये
विविधरंगी कार्यक्रमांमधून स्थानिक कलाकारांना संधी
पुलोत्सवातील संभाव्य कार्यक्रम
बहुरंगी, बहुढंगी कार्यक्रमांनी पुलोत्सव रंगणार आहे. चित्रपट, नाटक, संगीत, साहित्य व अन्य कलांविषयक कार्यक्रमांची रेलचेल या महोत्सवात असणार आहे. तरुण आणि स्थानिक कलाकारांच्या सहभागाने पुलोत्सव सजणार आहे. पुलंना भावलेल्या चित्रपटांचा महोत्सव, त्यांच्या अजरामर नाटकांचे सादरीकरण, सदाबहार कथांचे प्रस्तुतीकरण पुलंगी सादर केलेल्या अभिजात कलाविष्काराचे पुनरी बैठकीची लावणी गोर 'कवितांजली', बा. भ. बोरकर - मर्ढेकर इ.) विशेष दृक्-श्राव्य कार्यक्रम ('गुणगाईन आवडी', 'बहुरुपी पु. ल.', 'देवत' इ.) त्याचप्रमाणे पुलांच्या पुस्तकांचे, सी.डी.चे प्रदर्शन या आणि अशा अनेक कार्यक्रमांचा अंतर्भाव पुलोत्सवात असणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.