आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदे गटातील नेत्याच्या पत्नीची आत्महत्या:राजकीय वर्तुळात खळबळ, कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदे गटातील निलेश माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची गंभीर घटना पुण्यात घडली. बुधवारी विष प्राशन केल्यानंतर गुरुवारी रात्री त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

एकच खळबळ

पुण्यात राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.माझिरे हे माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची मनसेमधून हकालपट्टी करण्यात आली होती त्यानंतर त्यांनी बाळासाहेबांची शिवसेनामध्ये प्रवेश केला होता. माझिरे हे मनसे नेते वसंत मोरे यांचे कट्टर समर्थ होते.

वाद काय? स्पष्ट नाही

आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, कौटुंबिक वादातून माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केली असली तरी हा वाद नेमका काय होता हे अजून स्पष्ट झाले नाही.

अंतर्गत कुरबुरीमुळे पक्ष सोडला

माझिरे हे माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची मनसेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. माझिरे हे मनसे नेते वसंत मोरे यांचे कट्टर समर्थ होते.

वसंत मोरे हे मनसेत काहीसे अडगळीत पडले होते. त्यामुळे माझिरे हे नाराज होते. तसेच पक्षांतर्गत कुरबुरी वाढल्या होत्या. त्यामुळे त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. तर मनसेने त्यांची हकालपट्टी केल्याचे जाहीर केले होते.

बातम्या आणखी आहेत...