आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील राजकीय घडामाेडीनंतर हिंदुत्वाच्या मुद्दयावर भाजप व शिवसेना बंडखाेर एकत्रित येऊन मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे विराजमान झाले आहे. शिंदे यांचे खंदे समर्थक असलेले माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या पुरंदर मतदारसंघात शिंदे यांनी मंगळवारी दुपारी जाहीर सभेस उपस्थित लावली. त्यानंतर जेजुरी गडास भेट देऊन त्यांनी मंदिरात दर्शन घेतले. प्रथमच जेजुरी मंदिरात भेट देणारे विद्यमान मुख्यमंत्री म्हणून नाेंद झाली आहे.
मार्तंड देवस्थानच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेजुरी गडास भेट देणार असल्याने स्वागताची माेठी तयारी करण्यात आली होती. मंदिराच्या समाेरील जागेत असलेल्या माेठया कासवाच्या प्रतिकृतीवर हळदीचा पिवळा भंडारा, खाेबरे यावेळी उधळण्यात आला. त्यानंतर देवस्थान ट्रस्टच्या वतीने मुख्यमंत्री यांना घाेंगडी व फेटा देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यावेळी जेजुरी गडावरील प्रसिद्ध खंडा तलवार उचलून आशीर्वाद घेतले. देवदर्शन, गडाची पाहणी करुन त्यांनी देवस्थानच्या विश्वस्तांसाेबत चर्चा केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जेजुरी गड जतन व संर्वधन करण्यासाठी विकास आराखडा तयार करण्यात आला हाेता. त्याचा पहिला टप्पा 109 काेटी रुपयांचा मंजूर झाला असून गडाची डागडुजी, दुरुस्ती करण्यासाठीचा निधी तातडीने द्यावा अशी मागणी यावेळी विश्वासतांकडून करण्यात आली.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, रखडलेले विकास कामांचा आढावा घेण्यासाठी मी आलेलो आहे. जेजुरीचे मंदिर हे प्राचीन असून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा विकास निधी कमी पडणार नाही. वेगवेगळ्या विभागातील रखडलेले विकास प्रकल्प यांचा आढावा मी घेत असून गतीने कामे करण्याकरता आम्ही काम करत आहे. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचा पुणे दौरा आणि बंडखोर आमदारांच्या कार्यालयातून काढले जात असलेल्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या प्रतिमा बाबत त्यांनी भाष्य करण्यास यावेळी नकार दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.