आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबाळासाहेबांची शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी संजय राऊत् यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागले आहे. संजय राऊतांनी राज्यसभेचा राजीनामा देऊन कोणत्यांही मतदारसंघातून निवडणूक लडवून लोकांमधून निवडून येऊन दाखवावे अशी टीका केली आहे. नाशिक शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील 50 पदाधिकाऱ्यांनी मुंबईत मुख्यमंत्री यांचे निवासस्थानी शिंदे गटात प्रवेश केला त्यावरुन खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जाेरदार टीका केली. त्याचा समाचार घेताना बाळासाहेबांची शिवसेना गटाचे नेते विजय शिवतारे यांनी प्रत्युत्तर देताना शनिवारी सांगितले की, संजय राऊत यांनी हिंमत असेल तर 12 तासाच्या आत खासदारकीचा राजीनामा द्यावा. उगाच बाष्कळ बडबड करण्यापेक्षा राज्यात काेणत्याही मतदारसंघातून निवडून येऊन त्यांची लायकी दाखवावी असा टाेला लगावला आहे.
खासदार संजय राऊत यांनी नाशिकचे पदाधिकारी शिंदे गटात गेल्यानंतर ‘सर्व चाेर, लफंगे शिंदे गटात गेले आहेत. हा कचरा हाेता, पानगळ हाेती. ती शिंदे गटात गेलीय अशी टिका केली हाेती. याबाबत शिवतारे म्हणाले, संजय राऊत यांनी जरा लाेकांमधून निवडणुकीला उभे राहून दाखवावे म्हणजे त्यांना त्यांची लायकी कळेल. ते सध्या आम्हाला कचरा म्हणतात. परंतु याच खासदार, आमदारांचे जीवावर ते राज्यसभेत खासदार म्हणून निवडून गेलेले आहे. त्यामुळे त्यांनी स्वाभिमानाने सर्वप्रथम खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि निवडणूक निवडून दाखवावी. उगाच उचलली जीभ आणि लावली टाळयाला असे प्रकार करु नयेत. राऊत यांचे चेहऱ्याचा महाराष्ट्राला वीट आलेला असून त्यांनी यापुढे बाष्फळ बडबड करण्यापेक्षा खासदारकीचा राजीनामा द्यावा. ज्यांचे जीवावर निवडून आले त्यांच्याबाबत चुकीचे वक्तव्य करत असेल तर प्रामाणिकपणे स्वत:चे पदाचा राजीनामा त्यांनी दिला पाहिजे.
जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर आयोजित सायकल फेरीला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुण्यात होणाऱ्या 'जी-20' परिषदेबाबत नागरिकांमध्ये जागृती व्हावी या उद्देशाने पुणे महापालिका सायकल क्लबतर्फे सायकल फेरीचे शनिवारी आयोजन करण्यात आले. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, डॉ. कुणाल खेमनार आणि विकास ढाकणे यांनी झेंडा दाखवून या फेरीचा शुभारंभ केला.
सायकल फेरीच्या माध्यमातून 'जी-20' बाबत तसेच पर्यावरण विषयक जनजागृती करण्यात आली. महापालिका मुख्य भवनापासून सुरू झालेली सायकल फेरी जंगली महाराज रस्ता, लोकमान्य टिळक रस्ता, थोरले बाजीराव रस्ता, शनिवार वाडा आणि पुन्हा महानगरपालिका इमारत अशा मार्गाने पूर्ण करण्यात आली.सुमारे पंधराशे सायकलप्रेमी नागरिक या सायकल फेरीत सहभागी झाले. पुणे महापालिकेचे सर्व विभाग प्रमुखदेखील या सायकल फेरीत सहभागी झाले होते.या सायकल फेरीचे नियोजन पुणे महानगरपालिका सायकल क्लबचे मुख्य समन्वयक सुरेश परदेशी आणि महापालिकेचे उपायुक्त (क्रीडा) संतोष वारुळे यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.