आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा शरद पवार भाकीत करतात तेव्हा उलटे घडते:CM एकनाथ शिंदेंचा टोला, म्हणाले - भाजप मित्रपक्षांना 400 पेक्षा जास्त जागा मिळतील

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेव्हा जेव्हा शरद पवार भाकीत करतात, तेव्हा तेव्हा उलटे घडते. कसबा पोटनिवडणुकीत मविआला विजय मिळाला. एका जागेवर विजय मिळवल्यानंतर पुढच्या निवडणुकीचे अंदाज शरद पवारांनी वर्तवणे आश्चर्याची बाब आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भाजप मित्रपक्षांना 400 पेक्षा जास्त जागा मिळतील असे भाकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

शरद पवारांचा अंदाज चुकला होता

शरद पवारांनी यापूर्वीही गोवा आणि उत्तर प्रदेशाबद्दल भाकित केले होते. ते म्हणाले होते की, गोवा, उत्तरप्रदेशात बदलाचे वारे वाहू लागले. त्यावेळी पोटनिवडणुकीत तेथे भाजपला अपयश आले. विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर तेथे भाजपचा पराभव होईल हे शरद पवार म्हणाले होते. पण याउलट घडले होते. त्यामुळे त्यांचा अंदाज चुकला आहे. जाणीवपूर्वक ते असे वक्तव्य करीत आहेत.

पवारांचा सांगितला किस्सा

सीएम शिंदे म्हणाले, शरद पवारांसारखे मोठे नेत तीन राज्यांच्या निवडणूक निकालावर दुर्लक्ष करू शकतो ही आश्चर्याची बाब आहे. मला आठवते की, एकदा हवामान खाते म्हणाले की, पाऊस पडेल. शरद पवार म्हणाले की पाऊस पडणार नाही. त्यांनी सांगितलेले भाकीत खोटे ठरले होते. जर ते खोटे ठरले तर मी शंभर पोते साखर वाटेल असे ते म्हटले होते. त्यांचे भाकीत खोटे ठरले. त्यांनी शंभर पोते साखर वाटली हेही तितकेच खरे आहे.

चारशे जागा भाजपला मिळणार

सीएम शिंदे म्हणाले, जेव्हा जेव्हा शरद पवार सांगतात त्याच्या उलट घडते. असे जुने जाणते लोक सांगतात. जेव्हा जेव्हा शरद पवारांनी भाकीत केले त्याचा उलट अर्थ घ्यायचा आहे. देशात नव्हे जगात मोदींना पहिल्या क्रमांकाची पसंती आहे. सर्व रेकार्ड तोडून आगामी निवडणुकीत चारशे जागा भाजप मित्रपक्षांना मिळेल. कसबा एक निवडणुक झाली. त्यावर राज्याचे व देशाचे भवितव्य सांगण्याची गरज नाही. विशेष म्हणजे की, शरद पवार जर यावरुन अंदाज काढत असतील तर तेही आश्चर्यच आहे.

बातम्या आणखी आहेत...