आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे महापालिकाजवळील विद्युत मोटार कंपनीच्या तळमजल्यावरील 3 हजार स्क्वेअर फूटच्या रेकॉर्ड रूमला बुधवारी सकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास आग लागली. आगीत रेकॉर्ड रूममधील ७० टक्के कागदपत्रे जळून खाक झाली. सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच वाहनांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.
घटनेबाबत पुणे अग्निशमन दलाचे अधिकारी प्रदीप खेडेकर यांनी सांगितले की, मंगला टॉकीज शेजारील परिसरात चार मजली व्यवसायिक इमारत आहे. इमारतीच्या तळमजल्यावर विद्युत मोटार कंपनीचे रेकॉर्ड रूम आहे. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात कागदपत्रे होते, अशी माहिती कंपनीचे मालक जयेश शाह यांनी दिली. इमारतीत दुसऱ्या मजल्यावर युनियन बँक तर, चौथ्या मजल्यावर भारतीय जनता पक्ष, पुणे शहर यांचे कार्यालय आहे. इमारतीच्या तळमजल्यावर आग लागल्याची माहिती मिळताच सुरुवातीला कसबा अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. मात्र मोठ्या प्रमाणात आग आणि धूर असल्याने अग्निशमन दलाच्या आणखी गाड्या घटनास्थळी मागून घेण्यात आल्या. गाड्यांनी सर्व बाजूंनी पाण्याचा फवारा मारत सदर आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.अग्निशमन दलाचे कर्मचारी राजू शेलार, राजाराम केदारी, मंगेश मिळवणे, सुनील टेंगळे, प्रताप फणसे यांच्या पथकाने आग आटोक्यात आणली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.