आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खोदकामात सापडले अवशेष:पुणे मेट्रोच्या खोदकामात सापडली हत्तीची हाडे, पुरातन भांडी आणि इतर दुर्मिळ अवेशष; तपास सुरू

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्थानिकांनी सांगितले या कारणामुळे सापडली हत्तीची हाडे

पुणे शहरात सुरू असलेल्या मेट्रोच्या खोदकामात शुक्रवारी हत्तीची हाडे आणि अनेक भांडी तसेच विविध रचनांचे अवशेष सापडले. या अवशेषांची तपासणी करण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आहे.

पहिल्या टप्प्यात पिंपरी ते रेंज हिल आणि शिवजी नगर ते स्वारगेट रोड या मार्गावर काम सुरू आहे. शिवाजीनगर ते स्वारगेटपर्यंत भूमिगत मेट्रो राहणार आहे. यादरम्यान शुक्रवारी एका बोगद्याचा उत्खननावेळी हे अवशेष सापडले.

यावेळी उपस्थित स्थानिकांनी सांगितले की बर्‍याच वर्षांपूर्वी महात्मा फुले मंडई परिसरात सर्कस होत होती. सर्कशीतील हत्तीच्या मृत्यूनंतर त्याला सर्कसच्या आत दफन करण्यात आल्याचे मानले जात आहे. दरम्यान ही हाडे किती जुनी आहेत हे ASIच्या अहवालानंतर स्पष्ट होईल. पुण्यातील इतिहासकार मंदार लावते यांनी सांगितले की, या जागेवर अनेक वर्षांपूर्वी सर्कल लावली जात होती. यामुळे असे होऊ शकते हा हत्ती येथे दफन केला असेल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser