आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एल्गार परिषद प्रकरण:आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांचे एनआयएसमोर आत्मसमर्पण, तेलतुंबडे यांना केली अटक

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
आनंद तेलतुंबडे (फाइल फोटो) - Divya Marathi
आनंद तेलतुंबडे (फाइल फोटो)
  • तेलतुंबडे, नवलखा आणि इतर 9 जणांवर एल्गार परिषदेत भडकाऊ भाषण केल्याचा आरोप

एल्गार परिषद-माओवादी संबंध प्रकरणात नागरी हक्क कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे यांना मंगळवारी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) अटक केली. तत्पूर्वी, तेलतुंबडे यांनी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दक्षिण मुंबईतील कम्बाला हिलमधील एनआयएच्या कार्यालयात आत्मसमर्पण केले आणि नंतर त्यांना एजन्सीने अटक केली.

गौतम नवलखा यांनीही आत्मसमर्पण केले

तेलतुंबडे यांना लवकरच येथील कोर्टासमोर हजर केले जाईल. तत्पूर्वी तेलतुंबडे हे त्यांची पत्नी रमा तेलतुंबडे आणि त्यांचे नातेवाईक आणि दलित नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासमवेत आत्मसमर्पण करण्यासाठी येथील एनआयए कार्यालयात पोहोचले होते. या प्रकरणातील सह-आरोपी नागरी हक्क कार्यकर्ते गौतम नवलखा यांनीही दिल्लीतील एनआयएकडे आत्मसमर्पण केले. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. नवलखाला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुंबईच्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे. 

सुप्रीम कोर्टाने फेटाळली जामीन याचिका 

सुप्रीम कोर्टाने 17 मार्च 2020 रोजी दोघांची जामीन याचिक फेटाळत तीन आठवड्यात आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. सर्वोच्च न्यायालयाने  9 एप्रिल रोजी दोघांना आत्मसमर्पण करण्यासाठी आणखी एका आठवड्याचा कालावधी दिला होता. 

तेलतुंबडे, नवलखा आणि इतर 9 जणांवर आहेत हे आरोप 

तेलतुंबडे, नवलखा आणि नऊ अन्य नागरी हक्क कार्यकर्त्यांविरोधात माओवाद्यांशी संबंध असल्याबद्दल बेकायदेशीर उपक्रम प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोरेगाव-भीमा येथे हिंसाचार झाल्यानंतर या कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेच्या बैठकीत या लोकांनी भडकाऊ भाषणे आणि विधाने केली होती. त्यामुळे दुसर्‍या दिवशी, 1 जानेवारीला कोरेगाव-भीमा हिंसाचार भडकला होता. 

दोघेही प्रतिबंधित माओवादी संघटनेचे सदस्य : पुणे पोलिस

पुणे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार तेलतुंबडे आणि नवलखा बंदी घातलेल्या माओवादी संघटनेचे सक्रिय सदस्य आहेत. त्यानंतर हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी करताना तेलतुंबडे आणि सह-आरोपी गौतम नवलखा यांना अटक पासून अंतरिम संरक्षण दिले होते. हायकोर्टाने त्यांच्या याचिका फेटाळल्यानंतर या दोघांनीही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. 

बातम्या आणखी आहेत...