आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय वायुदलाचे हेलिकाॅप्टर गुरुवारी पुणे विमानतळावरुन हैद्राबादच्या दिशेने क्षेपावले हाेते. मात्र, हेलिकाॅप्टर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे कॅप्टनच्या लक्षात येताच, बारामती परिसरातील माळेगाव येथील खांडज गावातील शेतात विमानाचे इर्मजन्सी लँडिंग करण्यात आले. अचानक माेकळया शेतात लष्कराचे हेलिकाॅप्टर उरतल्याने ते पाहण्यासाठी स्थानिकांनी गर्दी केली.
हेलिकाॅप्टरमध्ये तीन पुरुष व एक महिला प्रवासी प्रवास करत हाेते. बारामती तालुक्यातील खांडज गावाचे परिसरात हेलिकाॅप्टर आल्यानंतर तांत्रिक बिघाड झाल्याचे हेलिकाॅप्टर चालकाच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी माेकळे शेत पाहून सुरक्षितरित्या हेलिकाॅप्टर अलगदपणे शेतात उतरवले. परंतु अचानक भारतीय वायुदलाचे चेतक हेलिकाॅप्टर शेतात उतरल्याचे पाहताच खळबळ उडून नागरिकांनी गर्दी केली.
माळेगाव पोलिसांना याबाबत माहिती मिळताच, ते घटनास्थळी दाखल हाेऊन त्यांनी याेग्य ताे बंदाेबस्त लावला. यासंर्दभातील माहिती हाेताच, भारतीय वायुदलाचे अधिकारीही घटनास्थळी दुसऱ्या हेलिकाॅप्टरने दाखल झाले. त्यांनी तांत्रिक बिघाड झालेल्या हेलिकाॅप्टरची दुरुस्ती सुरू केली असून, हेलिकाॅप्टरमध्ये दुरुस्ती झाल्यानंतर ते साेलापूरच्या दिशेने रवाना करण्यात येणार आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, भारतीय वायुदलाचे प्रवक्ते विंग कमांडर अशिष माेघे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वायु दलाचे चेतक हेलिकाॅप्टर हे तांत्रिक बिघाडामुळे बारामती येथे इर्मजन्सी लँडिंगने उतरविण्यात आले आहे. हेलिकाॅप्टर मधील व्यक्ती आणि हेलिकाॅप्टर सुरक्षित असून हेलिकाॅप्टरची दुरुस्ती करण्यात येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.