आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

21 दिवसांत फेरफारची नोंद:भूमी अभिलेख विभागाचा ऑनलाइनवर भर; 'ई-फेरफार' योजनेत प्रॉपर्टी कार्डचाही समावेश

पुणे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दस्त नोंदणीनंतर ऑनलाइनच्या माध्यमातून संबंधित जमिनीच्या सात-बारा आणि फेरफार उताऱ्यामध्ये नोंद घेणाऱ्या 'ई-फेरफार' योजनेत प्रॉपर्टी कार्डचाही समावेश करण्यात आला आहे. राज्यभरात ही योजना भूमी अभिलेख विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे एखाद्या मिळकतीचा व्यवहार झाल्यानंतर केवळ 21 दिवसांत त्या मिळकतीच्या प्रॉपर्टी कार्डवर ऑनलाइनच्या माध्यमातून फेरफारची नोंद घेतली जात आहे.

साता-बारा ऐवजी कार्ड

भूमी अभिलेख विभागाने विविध प्रकारच्या सेवा ऑनलाइन देण्यावर भर दिला आहे. यापूर्वी ग्रामीण भागातील जमिनींचे खरेदी-विक्रीचा व्यवहार झाल्यावर खरेदीदाराची सात-बारा उताऱ्यावर नोंद होण्यासाठी ई-फेरफार योजना सुरू करण्यात आली. परंतु राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये सात-बारा उताऱ्याऐवजी प्रॉपर्टी कार्ड देण्यात आले आहे.

अशा शहरांमधील मिळकतीचा व्यवहार झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने प्रॉपर्टी कार्डावर नोंद घेण्यासाठी अनेक कसरती कराव्या लागत. त्यामध्ये वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात होता. त्यासाठी नागरिकांना कार्यालयात चकरा माराव्या लागत होत्या. या सर्व पार्श्‍वभूमीवर भूमि अभिलेख विभागाने प्रॉपर्टी कार्डच्या मिळकतींच्या खरेदी विक्रीसाठी ऑनलाइन ई-फेरफार करण्यासाठी 'एनआयसी' मार्फत संगणकीय प्रणाली तयार करून घेतली आहे. या सुविधेमुळे मिळकत खरेदीनंतर प्रॉपर्टीकार्डवर नोंद घेण्यासाठी नागरिकांना नगर भूमापन कार्यालयात हेलपाटे मारावे लागत नाही.

अशी आहे प्रक्रिया

या संगणकीय प्रणालीनुसार प्रॉपर्टी कार्डवरील मिळकतीची खरेदी विक्रीचा व्यवहार झाल्यानंतर याची माहिती ऑनलाइनद्वारे भूमी अभिलेख कार्यालयाला येत आहे. त्यानंतर त्याची छाननी होऊन लगेचच टिप्पणी तयार होते. त्यानंतर टिप्पणी मंजूर नोटीस ऑनलाइनच तयार होते. ही नोटीस ज्यांचे ई-मेल आयडी असेल त्यांना ई-मेलने आणि ज्यांचे पत्ते असतील त्यांना टपालाने पाठवण्यात येते. ही सर्व प्रकिया ऑनलाइन आणि एक-दोन दिवसांतच होत आहे. यातील पुढील टप्पा म्हणजे नोटीसवर हरकत देण्यासाठी 15 दिवसांचा अवधी देण्यात येतो. हरकत दाखल न झाल्यास प्रॉपटी कार्डवरील ई-फेरफार ऑनलाइन तयार होत आहे. त्यानंतर नागरिकांना तो ऑनलाइन पाहता येतो. त्यानंतर ऑनलाइन पैसे भरून डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रॉपर्टी कार्ड घरबसल्या उपलब्ध होते.

बातम्या आणखी आहेत...