आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बचतीच्या नादात नुकसान:उतारावर डिझेल वाचवण्यास इंजिन बंद केले, पॉवर ब्रेक लागला नाही!

पुणे8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील नवले पूल अपघात ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने घडल्याचे सांगितले जात होते. मात्र, पोलिस आणि आरटीओ अधिकाऱ्यांच्या तपासणीत अपघात ब्रेक फेल झाल्याने नव्हे, तर तीन लिटर डिझेल वाचवण्यासाठी चालकाने ट्रक न्यूट्रल करून बंद केला. परिणामी उतारात ट्रकची गती प्रचंड वाढली. पण ट्रकला पॉवर ब्रेक असल्याने ते लागले नाही, हे कारण समोर आले आहे. या अपघाताची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घेतली असून त्यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, नवले पूल परिसरात आणखी दोन अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.

कात्रज नवीन बोगदा ते नवले ब्रिजदरम्यान आठ किलोमीटरचा उतार आहे. या उतारावर ट्रकसारखे जड वाहन बंद केल्यास तीन लिटर इंधन वाचते. यामुळे ट्रकचालक न्यूट्रल गिअरवर वाहन बंद करून चालवतात. अचानक वाहन मार्गावर आल्यास ट्रकचालकाचे नियंत्रण सुटून अपघात होतो. वाहन न्यूट्रलवर आणि बंद असल्यास पॉवर ब्रेक तातडीने लागत नाही. या अपघातातील ट्रकची प्रादेशिक परिवहन कार्यालयाने पाहणी केली असता ट्रकचे ब्रेक व्यवस्थीत असल्याचे आढळले. यामुळे ट्रकचालकाने इंधन वाचवण्यासाठी तो न्यूट्रलवर चालवला असल्याची शक्‍यता व्यक्त केली आहे. ट्रक तपासणीचा अंतिम अहवाल प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून येणे बाकी आहे. ट्रकचालकावर गुन्हा दाखल : मणीराम छोटेलाल यादव (रा. मध्य प्रदेश) याने त्याच्या ताब्यातील ट्रक हयगय करत वाहतूक नियमांची पायमल्ली करून चालवून अपघातास कारणीभूत ठरला. तसेच इतर प्रवाशांना जखमी केले. अपघाताबाबत पोलिसांना महिती न देता, त्याचप्रमाणे अपघातातील जखमींना वैद्यकीय मदत न करता अपघातस्थळावरून पळून गेला. या सबबीवरून त्याच्यावर गुन्हा दाखल आहे.

अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करणार बोगदा ते पुलादरम्यान पाच वर्षांत २३ ठार, २८ जखमी कात्रज नवीन बोगदा ते नवले ब्रिजदरम्यान २०१८ पासून आजवर ४६ मोठे अपघात झाले आहेत. यातील १८ अपघातांमध्ये २३ जणांचा मृत्यू झाला, तर २० अपघातांमध्ये २८ नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. हे अपघात मानवी चुकांमुळे झाले असल्याचे निदर्शनास आले आहे.

तीव्र उतार असल्याने अपघात ^नवले ब्रिज परिसरातील अपघातग्रस्त भागांचा नॅशनल हायवे अॅथॉरिटी आणि इतर यंत्रणा मिळून अभ्यास करत आहे. तातडीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याबाबत संयुक्त बैठकीत चर्चा झाली आहे. नवीन कात्रज बोगदा ते नवले पुलादरम्यान इंधन वाचवण्यासाठी अनेक जण वाहन न्यूट्रल करून चालवले जात असल्याने अपघात घडत असल्याचेही दिसून आले आहे. -विजय मगर, वाहतूक पोलिस उपायुक्त, पुणे

बातम्या आणखी आहेत...