आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांनो लक्ष द्या:वाणिज्य प्रथम वर्षासाठी बीएमसीसीमध्ये प्रवेशपरीक्षा होणार, 12 जूनपर्यंत अर्ज भरण्याची सूचना

पुणे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाणिज्य शाखेच्या उच्च शिक्षणासाठी ख्यातकीर्त असणाऱ्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ‘बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालया’त (बीएमसीसी) प्रथम वर्ष वाणिज्य शाखेसाठी प्रवेश परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती प्राचार्या डॉ. सीमा पुरोहित यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मान्यताप्राप्त बोर्डाची बारावीची परीक्षा उत्तीर्ण असणे प्रवेशासाठी आवश्यक आहे. या परीक्षेसाठी 12 जूनपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. 16 ते 18 जून या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे.

बीकॉम, बीबीए, बीबीए (इंटररनॅशनल बिझनेस), बीबीए (कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन), बीव्होक (फिल्म मेकिंग अ‍ॅण्ड ड्रामॅटिक्स), बीकॉम (ऑनर्स), बीकॉम (फिनटेक), बीएमएस (बॅचरल ऑफ मॅनेजमेंट स्टडिज इन ईकॉमर्स) या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेता येणार आहे.

प्रवेशासाठी अंतिम गुणवत्ता यादी तयार करताना दहावी आणि बारावी परीक्षेतील गुणांच्या प्रत्येकी 20 टक्के आणि प्रवेश परीक्षेच्या गुणांच्या 60 टक्के 'वेटेज' असणार आहे.

या संकेतस्थळावर संपर्क साधावा

प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी http://www.bmcc.ac.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...