आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 हजारांवर उद्योजक, स्टार्टअप्स, कॉर्पोरेटर्ससाठी व्यासपीठ:नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉपोर्रेशनच्या आउटरीच सेंटरचा पुण्यात प्रारंभ

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाचा उपक्रम असलेल्या नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉपोर्रेशनच्या (एनआरडीसी) आउटरीच सेंटरचा प्रारंभ पुण्यामध्ये होत आहे. देशातील पाच हजारहून अधिक उद्योजक, स्टार्टअप्स, कॉर्पोरेटस्ना भारतीय तंत्रज्ञानाकरीता यामाध्यमातून व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. याशिवाय दोन हजारपेक्षा अधिक पेटंट दाखल झाले असून लाखोंना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.

पुण्यात सुरु असलेल्या केंद्रामुळे या उपक्रमास व तरुणाईला अधिक पाठबळ मिळेल, असा विश्वास एनआरडीसी नवी दिल्लीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अमित रस्तोगी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी एनआरडीसीचे संचालक शेखर मुंदडा उपस्थित होते.

अमित रस्तोगी म्हणाले, विविध राष्ट्रीय संशोधन व विकास संस्था, विद्यापीठ, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमधून निर्माण होणा-या तंत्रज्ञानाचा विकास, प्रचार व हस्तांतरण करण्याचे कार्य एनआरडीसी करीत आहे. केमिकल, अ‍ॅग्रो अ‍ँड फूड प्रोसेसिंग, लाईफ सायन्सेस, मेकॅनिकल, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स यांसह विक्रीयोग्य औद्योगिक उत्पादने व सेवांमध्ये संशोधनास चालना देण्यास कार्यरत आहे. यामुळे आजपर्यंत सुमारे ४५०० कोटी रुपयांची भर राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत पडली आहे.

एनआरडीसीच्या सेवांचा विस्तार करण्यासाठी पुण्यातील आगरकर संशोधन संस्था (एआरआय) कॅम्पसमध्ये आउटरीच सेंटर स्थापन करण्यासाठी संपर्क साधला. त्यानुसार हे केंद्र सुरु होत आहे. या आउटरीच सेंटरद्वारे पेटंट, डिझाइन, कॉपीराइट, ट्रेडमार्क इत्यादी दाखल करणे आणि देखभाल करणे, ही कामे होणार आहेत. तसेच आविष्कार, प्रक्रिया, उत्पादन, उत्पादनासाठी उल्लंघन संरक्षण आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाशी संबंधित संपूर्ण उपक्रम हाती घेण्यात येईल. क्षेत्रातील शोधक, अकादमी, स्टार्टअपद्वारे विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा प्रचार करण्यास पुढाकार घेतला जाईल.

महाराष्ट्रात पहिल्यांदा आउटरिच सेंटर पुण्यात सुरु करुन करीत आहोत. याचा फायदा निश्चितपणे स्टार्टअप् व तंत्रज्ञान विकसित करण्यास होईल. इतकेच नव्हेतर लवकरच आगरकर संस्थेने जी जागा दिली आहे, तेथे या सेंटरसोबतच एन्क्युबेशन सेंटर सुरु होईल. याचा फायदा नव उद्योजकांना होईल असेही त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...