आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:तिसऱ्या लग्नानंतरही पत्नी न नांदल्याने आत्महत्या

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका तरुणाची तीन लग्ने झाली. मात्र, तिन्ही बायका न नांदल्यामुळे नैराश्यात गेलेल्या एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी येथे उघडकीस आली. आत्महत्या केलेला तरुण दीड महिन्यापासून बेपत्ता होता. त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत येथील एका जंगलात सापडला.

शेखर शांताराम पवार (२८, रा. वाफगाव मांदळेवाडी, ता. खेड, पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत शांताराम गेनू पवार यांनी पारगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. शेखरची तीन लग्ने झाली होती. मात्र, त्याच्या तिन्ही बायका त्याला सोडून गेल्या. त्यामुळे तो नैराश्यामध्ये होता. त्याच्या मेंदूवर परिणाम झाला होता. त्याने यापूर्वी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. दीड महिन्यापूर्वी तो दोरी घेऊन घराबाहेर पडला होता. तो घरी परत न आल्यामुळे त्याच्या नातेवाइकांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार खेड पोलिस ठाण्यात दाखल केली होती. दरम्यान, २९ नोव्हेंबरला पहाडदरा गावच्या हद्दीत जंगलात गळफास घेतल्याचा सांगाडा सापडला. मृत व्यक्तीच्या खिशातील कागदपत्रांमुळे तो शेखर पवार असल्याची खात्री पटली.

बातम्या आणखी आहेत...