आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपी जेरबंद:लोकांनी कपडे फाडले तरी महाराष्ट्र पोलिसांनी ‘सेक्स्टॉर्शन’ आरोपीच्या मुसक्या आवळल्या!

पुणे7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आराेपी निसटला, २ किमी पाठलाग करून पकडले
  • राजस्थानातील अलवर जिल्ह्यात पाेलिसांवर हल्ला

दत्तवाडी पोलिस ठाणे हद्दीतील सेक्स्टॉर्शन प्रकरणात पुणे पोलिसांनी मुख्य सूत्रधारास राजस्थानातील अलवर जिल्ह्यातील गुरुगोठडी गावातून जेरबंद केले. त्याला अटक करताना गावातील लोकांनी तीव्र विरोध करत दगडफेक केली. झटापटीत पोलिसांच्या अंगावरील कपडेही फाटले. आरोपी पळून गेला. मात्र त्याही अवस्थेत पोलिसांनी धाडस दाखवत अडीच किलोमीटर पाठलाग करत आरोपीला अटक केली. विशेष म्हणजे अटकेतील आरोपी हा देशभरातील सेक्स्टॉर्शन गुन्ह्यांचा मास्टर माईंड निघाला. अन्वर सुबान खान (२९ , रा. गुरुगोठडी, ता. लक्ष्मणगढ, जि. अलवर, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्याचे बदमाशाचे नाव आहे.

पुण्यासह देशभरात सेक्‍सटॉर्शन करून खंडणी उकळण्याचे प्रकार मागील दोन ते तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. सेक्‍सटॉर्शनद्वारे ब्लॅकमेलिंगला घाबरून अनेकांनी आत्महत्याही केली. पुणे शहरातही दोन तरुणांनी आत्महत्या केली.

मागितली २ दिवसांची कोठडी, कोर्टाने दिली ४ दिवस पुण्यातील दत्तवाडी पोलिसांनी आरोपीला राजस्थानमधील स्थानिक न्यायालयात ट्रांझिट रिमांडसाठी हजर करून दोन दिवसांच्या रिमांडची मागणी केली. मात्र न्यायालयाने स्वत:हून चार दिवसांचा रिमांड दिला. न्यायाधीशांनी खासगीत दत्तवाडी पोलिसांना मी ही सेक्स्टॉर्शनला बळी पडलो आहे. यामुळे आरोपीकडून जास्तीत जास्त माहिती मिळवून हा प्रकार थांबवला जावा म्हणून रिमांडची मुदत आणखी दोन दिवस वाढवून दिल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...