आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'उत्सव रंगे...बाप्पा संगे'!:पुण्यात माजी अपंग सैनिकांनी केला 'बाप्पा मोरया 'चा जागर; विघ्नहर्ताच्या गुणगानाने मैफिलीचा आरंभ

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे खडकी येथील माजी अपंग सैनिक पुनर्वसन केंद्रात (पीआरसी) या सैनिकांसाठी विविध उपक्रम राबवले जातात, त्यांच्यातील एकाकीपणा दूर व्हावा, सकारात्मकता वाढावी या ऊद्देषाने कोरोना नंतर पहिल्यादांच यंदाच्या गणेशोत्सवात 'उत्सव रंगे...बाप्पा संगे ' या उपक्रमाचे आयोजन रंगकर्मी चोरडिया फाउंडेशन आणि आयली'ज डान्स अँड आर्ट अ‍ॅकॅडमीच्या वतीने करण्यात आले होते.

विघ्नहर्ताच्या गुणगानाने या मैफिलीचा आरंभ

युध्दभूमीवर शत्रूंबरोबर लढताना आपल्या प्राणाची पर्वा न करता मातृभूमीचे रक्षण करताना दुर्दैवाने या शूरवीरांना कायमचे अपंगत्व आले पण तूसभरही शौर्य, जिद्द कमी न होता आपल्या देशाबद्दल तीच राष्ट्रभक्ती तेवत ठेवत हे 'जवान ' आज आपलं आयुष्य जगत आहेत. सृष्टीतील चराचरांत ज्याच्यामुळे उत्साह संचारतो अश्या विघ्नहर्ताच्या गुणगानाने या मैफिलीचा आरंभ झाला. सावनी सहस्त्रबुद्धे हिच्या कथ्थक नृत्याने वातावरण भक्तीमय होऊन गेले.

वादकांनी मोलाची साथसंगत

गायक हिम्मतकुमार पंड्या, राजेश शिंगाडे ,गायिका गितांजली जेधे यांनी आपल्या स्वराभिषेकाने या विशेष रसिकांना वेगळीच अनुभूती दिली. अभिनेत्री आयली घिया हिने लोककला आणि भारतीय नृत्यावर जबरदस्त सादरीकरण केले सुप्रसिद्ध अभिनेते संतोष चोरडिया आणि अभिनेत्री डॉ. कविता घिया यांची संकल्पना, लेखन असणाऱ्या या कार्यक्रमात त्यांनी गणेशोत्सव, त्याची महती आणि सैनिकांचे बलिदान आदी विविध विषयांना स्पर्श करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कीबोर्ड वर अमन , सुबोध चांदवडकर ,ड्रम मशीन विजय भोंडे, ढोलक विशाल अडसूळ या वादकांनी मोलाची साथसंगत केली.

याप्रसंगी पीआरसीचे प्रमुख कर्नल डॉ .आर.के. मुखर्जी म्हणाले, ज्या सैनिकांनी देशासाठी लढताना आपलं सर्वस्व गमावलं त्यांच्यासाठी इथे येऊन त्यांना सकारात्मकता देण्याचे, जगण्याचे बळ देण्याचे कार्य कलेच्या माध्यमातून होणे हिच ईश्वराची प्रार्थना, सेवा आहे. तसेच तीन युध्दांमध्ये सहभागी झालेले 86 वर्षीय माजी नायब सुभेदार भूपाल सिंग म्हणाले, या देशासाठी आजही युध्दभूमीवर जाण्याची वेळ आली तरी आम्ही तयार आहोत. या कलाकारांनी आमच्या आयुष्यात हा जो काही आनंद दिलाय त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही.

बातम्या आणखी आहेत...