आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिरूर न्यायालयात सुरू असलेल्या पोटगीच्या केसकरिता न्यायालयाजवळील पाटबंधारे कार्यालयाच्या मोकळ्या जागेत आलेल्या माजी सैनिकाने पत्नी व तिच्या आईवर गाेळीबार केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली हाेती. या घटनेत त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला असून याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस जेरबंद केले आहे. मंजुळा रंगनाथ झांबरे (रा. वाडेगव्हाण, ता.पारनेर, अहमदनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. मृताच्या आईवर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दीपक पांडुरंग ढवळे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. दीपक ढवळे हा माजी सैनिक असून सध्या ठाण्यातील अंबरनाथ येथे राहतो. ढवळे हा शिरूर न्यायालयाजवळील आवारात पोटगीच्या केस सुनावणीकरिता मंगळवारी सकाळी आला हाेता. त्या वेळी त्याच्यासोबत त्याचा सख्खा भाऊ संदीप ढवळे हासुद्धा हाेता. ते दाेघेही अंबरनाथ येथून रिक्षाने शिरूर येथे आले. न्यायालयाशेजारील पाटबंधारे कार्यालय परिसरात आल्यानंतर त्याने अचानक त्याच्याजवळील परवानाप्राप्त पिस्तुलामधून पत्नी मंजुळा झांबरे व तिच्या आईवर गाेळीबार केला. या घटनेत पत्नी मरण पावली असून सासू गंभीर जखमी झाली आहे. घटनेनंतर रांजणगाव पोलिसांचे पथक व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस यांनी आरोपीस शस्त्रांसह ताब्यात घेतले. याबाबत शिरूर पोलिस पुढील तपास करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.