आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाचा दोरीने गळा आवळून खून:पुण्यात बोपदेव घाटातील वळणावर मृतदेह आढळल्याने खळबळ

पुणे17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तरूणाचा दोरीने गळा आवळून खून केल्यानंतर त्याचा मृतदेह बोपदेव घाटातील सेल्फी पॉइंटनजीक फेकून दिल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी आरोपींसह मृताच्या नातेवाईकांचा शोध घेणे सुरू केले आहे. ही घटना 14 जूनला संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास उघडकीस आली असून याबाबत बुधवारी अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक संजय मोगले यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोपदेव घाटातील दुसऱ्या वळणाच्या डावीकडे सेल्फी पॉइंटनजीक मृतदेह पडल्याची माहिती एका नागरिकाने पोलीस नियंत्रण कक्षास दिली होती. त्यानुसार कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेउन पाहणी केली असता, 35 वयोगटातील तरूणाचा नायलन दोरीने गळा आवळून खून केल्याचे उघडकीस आले आहे.

त्याच्या डोक्यात हत्याराने वार केल्याचेही निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी आरोपींसह मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शववि्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे. आरोपीची ओळख पटवून नेमके कोणत्या कारणास्तव त्याचा खून करण्यात आला आहे याबाबत अधिक तपास करण्यात येत असल्याची माहिती कोंढवा पोलिसांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...