आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यात एक अतिशय धक्कादायक घटना घडली असून, यात एका महिलेवर बस चालकाने दोन वेळेस बलात्कार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी दाम्पत्याने दिलेल्या तक्रारीनुसार बस चालकाला सोमवारी, 13 जून रोजी पहाटे पोलिसांनी अटक केली.
नेमके प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथ शिवाजी भोंग (वय 38) असे अटक केलेल्या बस चालकाचे नाव आहे. या प्रकरणी वाशिम जिल्ह्यात राहणाऱ्या पीडितेने तक्रार दिली होती. पीडित महिला पुण्यात कामानिमित्त आली होती व हे दाम्पत्य राहण्यासाठी स्वागरेट परिसरात जागा शोधत होते. रात्री साडेअकराच्या सुमारास घराचा शोध घेत असताना हे दोघे नवरा बायको नवनाथ भोंगला दिसले. त्याने त्यांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी आम्ही राहण्यासाठी खोली शोधत आहोत, पण ती न मिळाल्याने आता एसटी स्टँडवर झोपायला जात असल्याचे सांगितले. आरोपीने त्यांना त्या ठिकाणी जाऊ नका. तुम्ही माझ्या गाडीत झोपा असे दोघांना सांगितले. दोघांनीही त्याच्यावर विश्वास बसला.
पीडितेला बसमधून ढकलले
पीडित महिलेचे पती लघुशंकेसाठी गेले असता बसचालकाने तिच्यावर दोन वेळा अत्याचार केला. त्यानंतर महिलेला बस मधून ढकलून दिले आणि तो फरार झाला. दरम्यान पीडितेचा पती बस उभ्या असलेल्या ठिकाणी आला. काही अंतरावर त्याला पीडित पत्नी दिसली. तिने तीच्या सोबत घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती पतीला दिली. त्यांनी पहाटे 5 वाजता स्वारगेट पोलिस ठाणे गाठत पोलिसांत तक्रार दिली.
सीसीटीव्हीवरून लागला छडा
पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली. स्वारगेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी दोन पथके संशयिताच्या शोधासाठी पाठवले. त्यांनी स्वारगेट परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली. यात बसचा क्रमांक दिसला. या बसचा शोध पोलिसांनी घेतला. ही बस एका पथकाला दिसली. त्यांनी ही बस थांबवण्याचा प्रयत्न केला. पण आरोपीने बस थांबवली नाही. पोलिसांनी त्याचा पाठलाग करत बिबेवाडी परिसरात ही बस थांबवली. आरोपी हा प्रवाशांना घेऊन कर्नाटकला जात होता. पण त्या आधीच पोलिसांनी त्याला अटक केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.