आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:मोटारीचे महागडे सायलेन्सर चोरणारे गजाआड, 10 गुन्हे उघड

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मोटारीचे महागडे सायलेन्सर चोरणाऱ्या दोघांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने पकडले. जवळपास ६० ते ७० हजार रुपये किमतीचे सायलेन्सर हे आरोपी पुण्यातील एकाला अवघ्या १० ते १५ हजार रुपयांमध्ये विकत होते. चोरट्यांकडून सायलेन्सर चोरीचे दहा गुन्हे उघडकीस आले. शाहनूर मुनेर शेख (रा. राळेगण थेरपाळ, ता. पारनेर, जि. नगर) व आकाश संजय भंडलकर (रा. मलठण, ता. शिरूर, जि. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. चोरट्यांचा साथीदार समीर रशीद सय्यद (रा. राळेगण थेरपाळ, ता. पारनेर, जि. नगर) आणि सायलेन्सर विकत घेणारा माजिद खान (रा. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...