आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पा तसेच मसाज सेंटरच्या नावाखाली चालणार्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश सामाजिक सुरक्षा विभागाने गुरुवारी संध्याकाळी केला. याप्रकरणी सहा जणांना अटक करताना तब्बल अकरा जणांवर शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी चार मणीपुरी तरुणींचीही सुटका करण्यात आली.
मालकाचा शोध सुरू
स्पा सेंटरचे सहायक व्यवस्थापक जूनेल हुसेन इलास अली (वय 32), राय सोलोमन (वय 26), विजय सुनील पवार (वय 22), स्टिफन खांगबा रांग (वय 25), महमद फुजेल अहमद सीराजिल हक (वय 22) आणि काबूल हुसेन अमीर अली चौधरी (वय 26) असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहेत. तसेच अमोल दिलीप रामगडे (मॅनेजर), स्पा सेंटरचे मालक नौशाद शेख, सुधीर पाटील, अमित प्रताप डोमले, राजू बाळकृष्ण शेडगे यांचा पोलिस शोध घेत आहेत.
एक्स्ट्रा सर्व्हिसच्या नावाखाली...
सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ निरीक्षक राजेश पुराणिक यांनी सांगितले, गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता कोरेगाव पार्क पोलिस स्टेशन हद्दीतील नॉर्थमेन रोडवर लिबर्टी सोसायटीतील फेज 2 मध्ये गोल्डन ओक स्पा, मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवत असल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानुसार सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बनावट गिर्हाईक पाठवून सापळा रचण्यात आला. या ठिकाणी पीडित मुलींकडून मसाजसह एक्स्ट्रा सर्व्हिसचे नावाखाली वेश्या व्यावसाय चालत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी सहा जणांना अटक करण्यात आली. तर चार तरुणींची सुटका करण्यात आली.
झिरो पोलिसांचा गुन्ह्यात सहभाग
गोल्डन ओक स्पामध्ये मालीश व स्पा बरोबरच लोकांना एक्स्ट्रा सर्व्हिसेस नावाखाली महाविद्यालयीन तरुणींमार्फत खुल्या प्रमाणात वेश्या व्यवसाय करीत असल्याचे समजले होते. यासाठी त्यांनी सोशल मीडियावर एक उत्तेजक लेख लिहून वेबपेजवर अपलोड केले होते. या छाप्यात कारवाई करण्यात आलेला गोल्डन ओक स्पाचा व्यवस्थापक अमोल दिलीप रामगडे हा झिरो पोलिसिंगचे देखील काम करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.