आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे विद्यापीठाच्या पीएच.डी प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ:संशोधन मार्गदर्शकांकडील रिक्त जागेचा तपशील घेण्याचे काम सुरु

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून शैक्षणिक वर्ष 2022-23 ची पीएच.डी प्रवेश प्रक्रिया कार्यान्वित करण्यात आली आहे. त्या अंतर्गत विद्यापीठाशी संलग्न सर्व शैक्षणिक विभाग व संशोधन केंद्र यांच्याकडून मान्यताप्राप्त संशोधन मार्गदर्शकांकडील रिक्त जागेचा तपशील घेण्यात येत आहे. पुणे विद्यापीठाची पीएच.डी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात दहा दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती शुक्रवारी विद्याीपीठातर्फे देण्यात आली आहे.

संशोधन केंद्रातील मान्यताप्राप्त मार्गदर्शकांकडे रिक्त असलेल्या जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी विद्यापीठाच्या संकेस्थळ (http://bcud.unipune.ac.in/root/login.aspx) या लिंकवर 20 ऑगस्ट 2022 पर्यंत ही माहिती मान्यताप्राप्त पीएचडी मार्गदर्शकांनी भरायची होती, मात्र त्यास आता मुदतवाढ देण्यात आली.

मार्गदर्शकांनी 30 ऑगस्टपर्यंत आपला माहिती संशोधन केंद्रामार्फत सादर करायची आहे. ज्या मार्गदर्शकांना शैक्षणिक वर्ष 2022 मध्ये विद्यार्थी घ्यायचे नाहीत त्यांनीही आपल्याकडे नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची अद्ययावत माहिती सादर करणे आवश्यक आहे. मार्गदर्शकांना याबाबत काही तांत्रिक अडचण आल्यास त्यांनी 020- 71533633 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा phdtracking_support@pun.unipune.ac.in या संकेस्थळावर संपर्क साधावा असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.

पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज करा- विद्यापीठ

पदवी प्रमाणपत्रासाठी 22 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान अर्ज करण्याचे आवाहन विद्यापीठाने केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 121 वा पदवी प्रदान समारंभ लवकरच घेण्यात येणार असून यासाठी ऑक्टोबर/नोव्हेंबर 2021 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज करावा, असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.

ऑनलाईन अर्जाची सोय

विद्यापीठाच्या convocation.unipune.ac.in या लिंकवर ऑनलाईन अर्ज करावेत. अर्जाचा नमुना, शुल्क आदीबाबत सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दिली आहे. पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र मिळविण्याकरिता विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज योग्य शुल्कासह भरल्यानंतर अंतिम वर्षाच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत अपलोड करणे आवश्यक आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा प्रमाणपत्र विभागाकडून देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...