आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • F. Mr. Shinde Has His Feet On The Ground Despite Having A Sensitive Literary Talent That Makes Him Uncomfortable A Tribute To Sharad Pawar

फ. मुं. अस्वस्थता टीपणारे संवेदनशिल साहित्यिक:प्रतिभा लाभूनही त्यांचे पाय जमिनीवर- शरद पवारांचे गौरवद्गार

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

''प्रतिभा लाभूनही जमिनीवर पाय असलेले, तुमच्या आमच्यात मिसळणारे फ. मुं. संवेदनशील साहित्यिक असून समाजातील सभोवतालचे वातावरण पाहून त्यातील अस्वस्थता टिपणारा हा साहित्यिक आहे'' असे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी सायंकाळी येथे काढले.

अमृतमहत्सवानिमित्त सत्कार

फ.मुं. शिंदे मित्रमंडळ आणि परिवारातर्फे ज्येष्ठ कवी आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष फ.मुं. शिंदे यांचा अमृत महोत्सवानिमित्त ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते शिंदे यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

दिग्गजांची उपस्थिती

या प्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, लीला फकीरा शिंदे, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे कार्यध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, समीक्षक प्रा. विश्वास वसेकर, संवाद, पुणेचे सुनील महाजन, ऋचा शिंदे, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणीचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

'फ. मुं'ची ग्रामीण भागाशी नाळ

पवार म्हणाले की, ''फ.मुं. शिंदे यांचे साहित्यातील योगदान मोठे असून माणसे जोडण्याची, त्यांच्याशी सुसंवाद ठेवण्याची आणि संपर्क प्रस्थापित करण्याची अनोखी कला त्यांच्याकडे आहे. फ.मुं. हे खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाशी नाळ जोडलेले साहित्यिक आहेत.''

फ.मुं. शिंदे म्हणाले..

फ.मुं. शिंदे म्हणाले, ''एक साहित्यिक म्हणून राजकारणाकडे पाहण्याची आमची वेगळी दृष्टी आहे. उपरोधीक टिप्पण्या करून आम्ही समाजाची स्पंदने मांडत असतो.'' यावेळी त्यांनी आई ही त्यांची प्रसिद्ध कविता सादर केली.

सुशीलकुमार शिंदे म्हणाले,' फ.मुं. शिंदे म्हणजे जातीपातीच्या पलीकडे जाऊन एक ठोस भूमिका घेऊन साहित्यविश्वात आणि समाजात वावरणारा साहित्यिक आहे,' यावेळी रामदास फुटाणे, प्रा. मिलिंद जोशी आणि प्रा. विश्वास वसेकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन ईटकर यांनी केले. सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले. सुनील महाजन यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...