आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रकांत पाटलांच्या चेहऱ्यावर फेस मास्क:पिंपरीतील कार्यक्रमात शाईफेक घटना टाळण्यासाठी खबरदारी

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकतेच राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी मध्ये शाईफेक घटना घडली होती. त्यानंतर पाटील यांना मोठा पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आला आहे तरी सुद्धा पाटील यांनी या गोष्टीचा धसका घेत,

शाईफेक घटना टाळण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पिंपरीतील कार्यक्रमात तोंडला पारदर्शक मास्क परिधान करण्यात आल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सांगवी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर आयोजित पवनाथडी यात्रेला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी भेट दिली आणि सहभागी बचत गटांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी आमदार उमा खापरे, महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, माजी महापौर माई ढोरे आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, महिला स्वावलंबी होत नाहीत तोपर्यंत समाजाच्या प्रगतीला मर्यादा आहेत. महिला बचत गटांना प्रशिक्षण आणि बाजार उपलब्ध करून दिल्यास ते अधिक सक्षमपणे काम करतील. बचत गटांनी नागरिकांची गरज ओळखून नवे उत्पादन आणि सेवा देण्याचा प्रयत्न करावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. बचतगटांना असे नवे प्रयोग करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल असेही पाटील म्हणाले.

पवनाथडी यात्रेविषयी...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाकडील महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत महापालिका हद्दीतील महिला बचतगट, वैयक्तिक महिला यांनी तयार केलेल्या वस्तू उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, महिलांना मार्केटिंग कौशल्ये ज्ञात व्हावीत, महिला उद्योजिका तयार होऊन महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात या हेतूने गवनाथडी जत्रेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या विविध प्रकारच्या गोष्टी यात ठेवण्यात आल्या आहे.

पवनाथडी जत्रेत एकूण 400 इतकी स्टॉल आहेत, तर 560 बचगटांनी यात्रेत सहभाग घेतला आहे. बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू विक्रीचे 246 स्टॉल, महाराष्ट्रीयन मराठमोळ्या शाकाहारी पदार्थाचे 177 स्टॉल, तर मांसाहारी पदार्थाचे 137 स्टॉल यात्रेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...