आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5, 10 हजार नव्हे कोट्यवधींचा गंडा:परताव्याच्या आमिषाने 39 जणाची 4. 62 कोटींची फसवणूक, कंपनीच्या मुख्यसंचालक 8 जणांवर गुन्हा

पुणे17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बनावट कंपनी स्थापन करून कंपनीच्या नावे विविध योजना जाहीर करून नागरिकांना लाखो रूपयांच्या रकमा ट्रेडिंग कंपनीत गुंतविण्यास भाग पाडून 39 जणांची एकूण चार कोटी 62 लाख 15 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीच्या मुख्यसंचालकासह आठ जणांवर चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघा आरोपीना अटक करण्यात आली आहे.

याबाबत ए. एस. ट्रेडर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स एललएलपी या कंपनीचा मुख्य संचालक लोहितसिंग सुभेदार, कंपनीचा आशिया मार्केटींगचा प्रमुख तसेच पुण्यातील ऑफिस चालक अमर चौघुले, डायमंड ग्रुपचे व टेक्सट्रग व्हेन्चर्सचा प्रमुख भिकाजी कुंभार, पिलर व कॅपिटल सिक्रेटचा कंपनीचा प्रमुख बाबुराव हजारे, ए. एस. टे्रडर्स डेव्हलपर्स अ‍ॅण्ड एलएलपी कंपनीचे पार्टनर व संचालक अदिनाथ पाटील, लोणावळा येथील फ्रॅचायजी चालक प्रदिप मड्डे व कंपनीचे पुणे जिल्हा फ्रॅन्चायजी चालक संतोष वाजे अशा आठ आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याप्रकरणी मड्डे आणि वाझे यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत व्यावसायीक असलेले गुंतवणुकदार प्रकाश महालिंग खंकाळे (वय - 52, रा. धायरी, सिंहगडरोड,पुणे) यांनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार नोव्हेंबर 2022 ते आतापर्यंत घडला आहे.

पोलिसांनी़ दिलेल्या माहितीनुसार, ए. एस. कंपनीचा मुख्य संचालक सुभेदार आणि इतर सात जणांनी नागरिकांना फसवण्याच्या उद्देशाने बोगस ट्रेडींग कंपनी काढली होती.संबधित कंपनीच्या माध्यमातून विविध योजना जाहीर केल्या. गुंतवणुकीवर मोठ्या परताव्याचे, महागड्या गाड्या बक्षीस देण्याचे, विदेशात सहलीला नेण्याचे आमिष दाखवुन विविध योजनांच्या नावे गुंतवणुकदारांकडून लाखोंच्या रकमा जमा करून काही दिवस त्यांना परतावा देण्याचा बहाणा केला.

गुंतवणुकदारांचा विश्वास संपादन करून त्यानंतर सदर स्विकारलेल्या रकमावर कोणताही परतावा किंवा रक्कम परत न करता 39 गुंतवणुकदारांची एकूण चार कोटी 62 लाख 15 हजार परत न देवुन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.