आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोतया पोलिसाला पुण्यात ठोकल्या बेड्या:विविध प्रकरणात अडकवण्याची धमकी देत 5 लाखांची खंडणी उकळली

पुणे9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विविध प्रकरणांत अडकविण्याची धमकी देत एकाकडून तब्बल 5 लाखांची खंडणी उकळणार्‍या तोतया पोलिसाला सहाय्यक पोलिस आयुक्त दोन यांच्या पथकाने अटक केली आहे. अशी माहिती पोलिसांनी शुक्रवारी (25 नोव्हेंबरला) दिली. मधुकर विलास सापळे (रा. जांभुळवाडी रोड, आंबेगांव,) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

काय आहे प्रकार?

पुण्यातील विमाननगर परिसरात राहणार्‍या एकाकडून पाच लाख रूपयांची खंडणी उकळल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर तपाास करीत होते. चौकशी दरम्यान आरोपी मधुकर सापळे याने पोलिस असल्याची बतावणी करुन फिर्यादीला गुन्ह्यामध्ये अडकविण्याची धमकी दिली. त्यांच्याविरूद्ध अकोला येथे पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याचे खोटे सांगितले. ते पुण्यात राहत असलेल्या सोसायटीची निवडणुक रद्द करण्यासाठी उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे यांच्या सहीचे बनावट पत्र तयार करुन घेतले. वेगवेगळी भीती घालून त्यांच्याकडून ऑनलाईनरित्या 5 लाख 5 हजार रूपयांची खंडणी उकळली होती. गुन्हा निष्पन्न झाल्याने पथकाने त्याला अटक केली.

ही कामगिरी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदिप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शंकर पाटील, सुधीर इंगळे, राहुल सकट, अमोल वाडकर यांनी केली आहे.

गुन्हा दाखल

पुणे शहरातील विविध हॉटेल मालक-चालकांविरूद्ध सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. कोरेगाव पार्कमधील अलिशान हॉटेलसह पब, रेस्टॉरंट बारमध्ये मोठमोठ्या आवाजात गाणी वाजवून नागरिकांना मनस्ताप ठरणार्‍यांविरूद्ध कारवाई करण्यात आली. पोलिसांचे हॉटेलमधील 2 लाख 70 हजारांचा साउंड मिक्सर जप्त करीत गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे घटना?

कोरेगाव पार्क परिसरातील हॉटेल आणि पबमध्ये रात्री दहानंतरही साउंड सिस्टीमवर मोठयाने संगीत वाजवले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाने पब्लीक रेस्टॉरंट अ‍ॅण्ड बारवर कारवाई केली. संबंधित हॉटेलमधून 2 लाख 70 हजारांची साउंड सिस्टीम जप्त केली. त्यांच्या विरूद्ध ध्वनीप्रदुषण व पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.

ही कामगिरी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार, सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी पाटील, सहाय्यक निरीक्षक अनिकेत पोटे, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, मनिषा पुकाळे, आण्णा माने, इरफान पठाण, संदीप कोळगे, पुष्पेंद्र चव्हाण, अमित जमदाडे यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...