आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या नावाने भामट्याकडून बनावट फेसबूक अकाऊंट

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या नावाने अज्ञात व्यक्तीने बनावट फेसबुक अकाउंट काढले आसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी थेट पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे लेखी तक्रार मंगळवारी दाखल केली आहे.यापूर्वी ही त्यांनी अशाप्रकारे सायबर पोलिसात तक्रार दिली होती. मात्र, त्यावर योग्य ती कारवाई सायबर पोलिसांकडून करण्यात आली नाही.

अनोळखी चोरट्यांनी 'माही वर्मा' या नावाने हे बनावट अकाउंट तयार केले असून त्या अकाउंटवर जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचे छायाचित्र लावण्यात आले आहे. त्याद्वारे जिल्हाधिकारी देशमुख यांच्या संपर्कातील व्यक्तींना मेसेज आणि फोन करून पैशांची मागणी करण्यात आली. मात्र सतर्क असलेल्या जिल्हाधिकारी यांच्या संपर्कातील लोकांनी याबाबतची माहिती डॉ. देशमुख यांना तात्काळ कळवले त्यामुळे याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी तातडीने लेखी अर्ज पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे देऊन संशयित आरोपीचा शोध घेण्यात यावा आणि त्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे.

याबाबत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, यापूर्वीही मला माझ्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट उघडल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती तीनच महिन्यात अशा प्रकारचा दुसरा प्रकार घडला असून याबाबत सायबर पोलिसांनी तपास करून आरोपीचा शोध घ्यावा अशी विनंती पोलिसांकडे करण्यात आली आहे याबाबत पुणे सायबर पोलीस पुढील तपास करत आहे.