आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यातील एका अपर पोलिस आयुक्त दर्जाच्या आयपीएस अधिकाऱ्याच्या विराेधात खाेटे लेटर लिहून ते व्हायरल केल्याप्रकरणी अज्ञात आराेपीवर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली आहे. याप्रकरणी अपर पोलिस आयुक्त यांचे वाचक पोलिस उपनिरीक्षक तुकाराम दत्तु नाळे (वय-54) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पुण्यातील पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण यांचे कार्यालयात तक्रारदार तुकाराम नाळे हे वाचक म्हणून काम करत आहे. तीन ऑक्टाेबर 2022 राेजी अप्पर पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण यांचे विरुध्द काेणीतरी अज्ञात इसमाने एक वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, महिला पोलिस उपनिरीक्षक या पोलिस अधिकाऱ्यांच्या नावांचा गैरवापर करुन व त्यांच्या खाेटया सहया करुन , त्यांना त्रास देण्याचे उद्देशाने अर्ज करुन नामदेव चव्हाण यांची बदनामी व्हावी व येथून बदली व्हावी या गैरउद्देशाने खाेडसाळपणे त्यांच्या लाैकीकास पूर्ण बाधा यावी या हेतूने कटकारस्थान रचले. सदर अर्जाच्या प्रती सर्व वरिष्ठ प्रशासकीय कार्यालये, पूर्व प्रादेशिक विभागातील पोलिस स्टेशन प्रभारी यांना पाठवुन बदनामी केली असल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अर्ज पोलिसांकडे आल्यानंतर त्यासंर्दभात चाैकशी करुन गुन्हा विलंबाने दाखल केल्याची माहिती बंडगार्डन पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक एस वाघमारे पुढील तपास करत आहे.
देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाचे घरी चाेरी
पुण्यातील वानवडी भागातील लु्ल्लानगर येथे राहणाऱ्या कुंजबिहारी बाबुलाल पाठक (वय-67) या 8 ते 14 डिसेंबर दरम्यान त्यांचे पुण्यातील वानवडी परिसरातील ब्रम्हा मेमाेरी फिल्ड इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील राहते घराचे सेफ्टी डाेअर व मुख्य दरवाजास कुलुप लावून बंद करु गेल्या हाेत्या. त्यावेळी काेणीतरी अज्ञात आराेपीने लबाडीच्या इराद्याने त्यांचे राहते घराचे सेफ्टी डाेअरचे व मेन डाेअरचे कुलुप ताेडून घरात प्रवेश करुन हाॅेल मध्ये असलेल्या कपाटातील 40 हजार रुपये राेख व एक लाख रुपयांची 14 कॅरेटची हिऱ्याची अंगठी असा एक लाख 40 हजारांचा मुद्देमाल घरफाेडी चाेरी करुन नेला आहे. याबाबत वानवडीपोलिस पुढील तपास करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.