आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Falling Without Using 482 Quarantine Coaches Of Railways! Despite The Increase In The Number Of Patients, There Is No Use By The State Government

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाशी युद्ध:रेल्वेचे 482 क्वारंटाइन कोच वापराविना पडून! रुग्ण वाढूनही राज्य शासनाकडून वापरच नाही

मंगेश फल्ले | पुणे5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर या पाच विभागांत एकूण 482 विशेष क्वारंटाइन कोच

राज्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यासाठी शहरी भागात काेट्यवधी रुपये खर्चून जम्बाे काेविड रुग्णालये उभारली जात आहेत. मात्र, राज्यात रेल्वेने बनवलेले ४८२ क्वाॅरंटाइन काेच वापराविना पडून आहेत. रुग्णसंख्या वाढूनही अद्याप राज्य शासनाने हे रेल्वेचे काेच वापरासाठी रेल्वेशी संपर्कच साधलेला नाही.

रुग्णालयांची संख्या कमी पडेल या दृष्टीने कोरोना रुग्णांसाठी रेल्वे बोर्डाने एक्स्प्रेसचे डबे विलगीकरण कक्षात परावर्तित केले. याकरिता रेल्वे काेचमधील बर्थ काढण्यात आले. एका काेचमध्ये आठ ते नऊ रुग्ण विलगीकरणात राहू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली. प्रत्येक काेचमध्ये दाेन टाॅयलेट आणि दाेन बाथरूम तयार करण्यात आले. डब्यातील एका बाजूच्या टाॅयलेटचे बाथरूममध्ये रूपांतर केले गेले. काेचच्या खिडक्यांना जाळ्या बसवल्या. फॅन, लाइट, चार्जिंग पॉइंट यांची दुरुस्ती केली. रेल्वे पँट्रीचे (स्वयंपाक कक्ष) माेबाइल किचन केले. रुग्णांना गाडीतच जेवण, नाष्टा उपलब्ध होण्यासाठी नियाेजन केले. एका डब्यात रुग्णांवर उपचार करणारे आराेग्य कर्मचारी यांना राहण्याची, विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली. हे डबे जवळीलच एखाद्या रुग्णालयाशी समन्वय ठेवतील अशी सोय केली. समजा एखादा रुग्णाची प्रकृती गंभीर बनल्यास त्यास रुग्णालयात हलविण्याचे निश्चित करण्यात आले. तर, आवश्यकतेप्रमाणे आॅक्सिजन सिलेंडर लावण्याची सोयही यात आहे. या विशेष रेल्वेतील साफसफाई आणि निश्चित जागेवर पाेहचवण्याची व्यवस्था रेल्वेने करायची तर वैद्यकीय सुविधा पुरविण्याची जबाबदारी संबंधित राज्य सरकारने पाहायची असे काम चालते . देशात रेल्वेचे ५,२३१ विलगीकरण कोच आहेत. दिल्ली, उत्तरप्रदेश आणि तेलंगणा या राज्यांनी या क्वारंटाइन काेचचा वापर केला आहे. महाराष्ट्राने मात्र अद्याप रेल्वेचे क्वारंटाइन काेचचा वापर केलेला नाही.

रेल्वेच्या पाच विभागांत विशेष काेच

मध्य रेल्वेचे पुण्यातील जनसंपर्क अधिकारी मनाेज झंवर म्हणाले, मुंबई, पुणे, साेलापूर, भुसावळ आणि नागपूर या पाच विभागांत एकूण ४८२ विशेष काेराेना विलगीकरण काेच तयार करण्यात आले आहेत. मुंबई विभागात १२५, पुणे ६०, साेलापूर १८०, नागपूरमध्ये ५० तर भुसावळ मध्ये उर्वरित काेच ठेवण्यात आले आहेत. राज्य शासनाने संबंधित रेल्वे काेच वापरण्याबाबत लेखी पत्र रेल्वे विभागास दिल्यानंतर गरज असेल तेथे हे डबे वापरता येऊ शकतात. राज्य सरकारला काेराेना रुग्णांवर उपचाराकरिता बेड कमी पडल्यास ते या सुविधेचा वापर करू शकतील.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser