आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सप्रेसवे बनतोय मृत्यूचा सापळा:मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर माडप बोगद्याजवळ भीषण अपघात; 2 ठार तर, 10 जण जखमी

पुणे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा जिल्हयातील एक कुटुंबीय मुंबईच्या दिशेने जात असताना मुंबई-पुणे एक्सप्रेस जवळील माडप बोगद्याजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघाताची घटना मंगळवारी (06 सप्टेंबर) मध्यरात्री 2.00 ते 2.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या अपघातात 2 जण जागीच ठार झाले असून, कार चालक अंकुश राजाराम जंगम (32,रा.सातारा) याच्यासह एकूण 10 जण जखमी आहेत. त्यांच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहे. लक्ष्मी विठ्ठल कोंढाळकर (वय-24) व गणेश बाळू कोंढाळकर (वय-22) असे मृत व्यक्तींचे नाव आहे.

कसा झाला अपघात?

कोंढाळकर कुटुंबीय मुळचे सातारा जिल्हयातील वाई परिसरातील कोंढावळे गावचे रहिवासी आहे. सोवसारी रात्री ते राहत्या घरापासून मुंबईतील कोपरखैरन येथे जाण्यासाठी इको कारने निघाले होते. या कारमध्ये 10 ते 12 जण प्रवास करत होते. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर मंगळवारी मध्यरात्री 2.00 ते 2.30 वाजेच्या सुमारास त्यांची कार माडप बोगद्या जवळ आली. त्यावेळी रस्त्याच्या कडेला एक टायर पंक्चर झालेला ट्रक (केए-56-2799) उभा होता. ट्रकला कारने भरधाव वेगात असलेल्या कारवरील चालक अंकुश जंगम याचे वाहनावरील नियंत्रण सुटून पाठीमागून धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील लक्ष्मी कोंढाळकर व गणेशकोंढाळकर यांचा जागीच मृत्यु झाला. तर कारमधील इतर दहा जण जखमी झाले असून त्यातील पाच ते सहाजण गंभीर जखमी आहे. सर्व जखमींना एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

वाहतूक खोळंबली

सदर अपघात घडल्यानंतर पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक खोळबंली होती. अपघाताची माहिती मिळताच, घटनास्थळी देवदूत बचाव पथक यंत्रणा व आयआरबी पेट्रोलिंग पथकासह महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना त्यांनी रुग्णालयात हलवण्यासोबतच महामार्गावरील वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी कारचालक अंकुश जंगम याने हयगयीने, बेदारकापणे, निष्काळजीपणाने भरधाव वेगात वाहन चालवून, लेनची शिस्त न पाळता अपघात घडवल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...