आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Fatal Accident Of Car And Truck On Pune Ahmednagar Route Car Collided With Container; Five Members Of The Same Family Were Killed

पुणे - अहमदनगर मार्गावर भीषण अपघात:भरधाव कंटेनरची कारला धडक; एकाच कुटुंबातील 5 जण ठार

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे – अहमदनगर महामार्गावर रांजणगाव परिसरात कारेगावजवळील एस 9 हॉटेलजवळ विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरच्या धडकेत कारमधील एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सदर अपघातानंतर कंटेनर चालक गाडी जागेवर सोडून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

या अपघातात संजय भाऊसाहेब म्हस्के (वय 53), राम भाऊसाहेब म्हस्के (वय 45), राजू राम म्हस्के (वय 7 वर्षे), हर्षदा राम म्हस्के (वय 4 वर्षे), विशाल संजय म्हस्के (वय 16वर्षे) असे मयत झालेल्या व्यक्तींची नावे असून साधना राम म्हस्के (वय.35) या गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.या अपघातातील सर्व जखमी हे आवाने बुद्रुक (ता.शेवगाव, जि.अहमदनगर) येथील रहिवासी आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुणे नगर महामार्गावरून म्हस्के कुटुंब हे त्यांच्या स्कूल गाडीने पुणे बाजूकडे जात असताना मध्यरात्रीच्या सुमारास समोरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनर(एच आर.37 ई 7789) ची इको कार (एम एच.46 ए. एच.0063)या वाहनाला जोरदार समोरासमोर धडक बसली.अपघातानंतर रांजणगाव एमआयडीसी पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.यावेळी पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी शिरूरमधील वेदांत हॉस्पीटल आणि सूर्या हॉस्पीटल येथील रुग्णालयात दाखल केले.त्यातील गंभीर इजा झालेल्या चालक संजय म्हस्के,राम म्हस्के,राजू म्हस्के,हर्षदा म्हस्के,विशाल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.तर साधना म्हस्के यांना गंभीर दुखापत असल्याने अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

या अपघाताची भीषणता इतकी मोठी होती की कारचा चक्काचूर झाला आहे.या प्रकरणी पोलिसांनी दोषी कंटेनर चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास रांजणगाव एमआयडीसी पोलिस करत आहेत. दरम्यान अपघाताची माहिती मिळाल्याने रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे,उपविभागीय अधिकारी यशवंत गवारी यांसह संपूर्ण अंमलदार यांनी रात्रभर जागे राहून घटनेचा पंचनामा केला. या अपघातामुळे पुणे अहमदनगर महामार्गावर वाहनाच्या लांबलचक रांगा लागल्या.

बातम्या आणखी आहेत...