आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:स्वत:च्या 2 मुलींना चिरडले त्याच ट्रकखाली पित्याचीही आत्महत्या, सोशल मीडियावर मुलाशी चॅटिंग केल्याचा राग

पुणे9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलगी सोशल मीडियावर मुलाशी चॅट करते या कारणावरून एका संतापलेल्या पित्याने दोन्ही मुलींना ट्रकखाली झोपवून त्यांच्यावर ट्रक घालत ठार केले. नंतर त्याच ट्रकखाली आत्महत्या केल्याची घटना मावळ तालुक्यातील इंदोरी गावात रविवारी पहाटे घडली. मृत तिघेही मूळचे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील सावडी गावचे आहेत.

नंदिनी भरत भराटे (१८), वैष्णवी भरत भराटे (१४) आणि भरत ज्ञानदेव भराटे (४०) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व मावळ तालुक्यातील इंदोरी गावात अल्फानगर येथे राहत होते. नंदिनी मोबाइलवर एका मुलाशी व्हाॅट्सअॅप चॅट करत होती. या संशयाने संताप अनावर होऊन भरत भराटे याने रविवारी पहाटे दोन्ही मुलींना दमदाटी करून स्वतःच्या मालकीच्या ट्रकसमोर झोपवले आणि निर्दयपणे त्यांच्या अंगावरून ट्रक चालवला. त्यानंतर भरतने ट्रक चालत्या अवस्थेत ठेवून त्याच ट्रकखाली आत्महत्या केली. या प्रकरणी मृत मुलींच्या आईने तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...