आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बदला'ला उत्तर देणे भोवले:देवेंद्र फडणवीसांविरोधात आक्षेपार्ह शब्दांत फेसबुक पोस्ट लिहिल्याने तरुणावर गुन्हा

पुणे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्दांत फेसबुक पोस्ट लिहिल्यामुळे एका तरुणावर लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. अनिल हरपळे असे त्या तरुणाचे नाव आहे.

हरपळे शिवसेनेच्या ठाकरे गटाचा असल्याचे समजते. त्याच्याविरोधात कलम १५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

बदल्याची पोस्ट खुपली

शिवसेना आणि भाजपमध्ये काडीमोड झाला. त्यानंतर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत सहभागी झाले. याबाबत अजूनही आरोप-प्रत्यारोप होतात. त्यावर फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी एक ट्विट केले होते. त्यात म्हटले होते की, 'तुमच्यासोबत २४ तास असणारा, सत्ता भोगणारा व्यक्ती खंजीर खुपसतो. तुम्ही माझ्याशी बेईनामी कराल तर मी बदला नक्कीच घेईन. बेईमानाला जागा दाखवावी लागते दाखवली. होय मी बदला घेतला.'

आक्षेपार्ह भाषेत उत्तर

फडणवीस यांनी या पोस्टमध्ये बदला शब्द वापरला. त्याला अनेक राजकीय नेत्यांनीही आक्षेप घेतला. या ट्विटवर अनिल हरपळे यांनी आक्षेपार्ह शब्दांत फेसबुक पोस्ट लिहून उत्तर दिले. ही पोस्ट हवेली तालुक्यातल्या भाजप कार्यकर्त्यांनी पाहिली. त्यांनी ती पुणे जिल्हा भारतीय युवा मोर्चाचे संघटन सरचिटणीस संदीप भोंडवे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...