आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैत्री करावी या हट्टापायी:मैत्री करण्यासाठी अल्पवयीन मुलाकडून काेयत्याचा धाक

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओळखीच्या एका १४ वर्षीय मुलीने आपल्याशी मैत्री करावी या हट्टापायी एका १७ वर्षीय मुलाने मुलीस काेयत्याचा धाक दाखवून तिला घाबरवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार हडपसर परिसरात घडला. याप्रकरणी अल्पवयीन मुलाविराेधात हडपसर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुलीच्या ३६ वर्षीय आईने पाेलिसांकडे बुधवारी तक्रार दाखल केली. अल्पवयीन मुलावर याप्रकरणी विनयभंग, धमकावणे तसेच पॉक्सोच्या विविध कलमानुसार पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर मुलगी मंगळवारी क्लासला गेली असताना ती पुन्हा क्लासवरून परतताना संबंधित आराेपी मुलगा तिच्याजवळ आला. त्याने ‘माझ्याशी मैत्री करशील का?’ असे बाेलून तिचा पाठलाग केला. तसेच मागील १५ दिवसांपूर्वी तिला अडवून काेयता दाखवून ‘मैत्री कर नाहीतर जिवे ठार मारीन’ अशी धमकी दिली. अखेर तिने ही बाब पालकांना सांगितल्यावर प्रकार उघड झाला.

बातम्या आणखी आहेत...