आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:माहेरहून 20 लाख रुपये न आणल्याने पत्नीला पाजले फिनेल

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन हाॅटेल सुरू करण्यासाठी माहेरहून २० लाख रुपये न आणल्याने पतीने पत्नीला जबरदस्तीने फिनेल पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना पुण्यातील लोणी काळभोर परिसरात घडली.

याप्रकरणी लोणीकाळभाेर पोलिस ठाण्यात ३० वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार तिचा पती जीवन नारायण काळभाेर, दीर योगेश नारायण काळभाेर व सासू सुनंदा नारायण काळभाेर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीवन काळभाेर व पीडित महिला यांचे २०११ मध्ये लग्न झाले आहे. लग्नानंतर पती तिला वारंवार माहेरहून पैसे घेऊन ये असे म्हणत मारहाण करत होता. बुधवारी संबंधित महिला स्वयंपाक घरात काम करताना आरोपीने तिला माहेरहूरन पैसे न आणल्याने जबदस्तीने फिनेल पाजले. त्यानंतर महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...