आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किडनी प्रत्यारोपण:बेकायदेशीररीत्या किडनी प्रत्यारोपण प्रकरणी 15 जणांवर गुन्हा दाखल

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीररीत्या किडनी प्रत्यारोपण​​​​​​​​​​​​​​​​​​​​​ केल्याप्रकरणी कोल्हापूरच्या एका महिलेने तक्रार केली होती. १५ लाख रुपयांचे आमिष दाखवून तिची एक किडनी रुग्णास देण्यात आली, परंतु ठरलेले पैसे तिला देण्यात न आल्याने तिने केलेल्या आरोपाने खळबळ उडाली होती. याप्रकरणी पाेलिसांनी चाैकशी करून रूबी हाॅल क्लिनकचे प्रमुख परवेज ग्रँट, रुग्णालयाच्या नामांकित डाॅक्टरांसह एकूण १५ जणांवर कोरेगाव पार्क पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी अमित अण्णासाहेब साळुंखे, सुजाता अमित साळुंखे (रा, माेशी, पुणे), अण्णासाहेब साळुंखे (रा. जिवळा, ता. सांगोला, सोलापूर), सारिका गंगाराम सुतार (रा.कोल्हापूर), शंकर हरिभाऊ पाटील, सुनंदा हरिभाऊ पाटील, रवी गायकवाड, अभिजित मदने, रूबी हाॅलचे प्रमुख डाॅ. परवेझ ग्रँट, नेफ्रोलॉजिस्ट डाॅ.अभय सद्रे, डाॅ. हिमेश गांधी, डाॅ. भूपात भाटी, मंजूषा कुलकर्णी, सुरेखा जाेशी, रूबीच्या रेबेका जाॅन यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याबाबत आरोग्य सेवा मंडळ पुण्याचे उपसंचालक डाॅ. संजाेग सीताराम कदम (५९, रा. शनिवार पेठ, पुणे) यांनी पाेलिसांकडे फिर्याद दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...