आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरफोडी:पाचवी पास बंटीने यू ट्यूब बघून केल्या 8 चोऱ्या!

पुणे12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे शहरासह ग्रामीण हद्दीत घरफोडी आणि वाहनचोरी करणाऱ्या एका सराईताला गुन्हे शाखेच्या युनिट तीनने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, तीन दुचाकी, कटर असा ४ लाख ७५ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला असून आठ गुन्ह्यांची उकलही केली आहे. पोलिसांच्या चौकशीत संबंधित आरोपीने यूट्यूबवर चोरी तसेच कटावणीच्या साह्याने घरफोडी कशा प्रकारे करावी याची माहिती घेऊन चोऱ्या केल्याची कबुली दिल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिता मोरे यांनी दिली आहे.

रेवण ऊर्फ रोहन ऊर्फ बंटी बिरू सोनटक्के (२३, रा. गणपती माथा, वारजे माळवाडी, पुणे) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे. युनिट तीनचे पथक सिंहगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीचा समांतर तपास करत हाेते. घरफोडी करणारा कोथरूड परिसरात सोने विक्रीस येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने बंटीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने सिंहगड, शिक्रापूर, शिरूर, कोंढवा हद्दीत वाहनचोरीसह घरफोडीचे ८ गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याचे पाचवीपर्यंत शिक्षण झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...