आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:भाजपसोबत सरकार स्थापण्यासाठी आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये चढाओढ : चंद्रकांत पाटील

पुणे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडीच्या सरकारमधून कुणी प्रथम बाहेर पडायचे आणि भारतीय जनता पक्षासाेबत सरकार स्थापन करायचे, याची चढाआेढ सुरू आहे. नेमका काेणता पक्ष आमच्यासाेबत येणार याबाबत जाहीरपणे सांगण्याइतका मी राजकीय असमंजस नाही, परंतु ‘नया साल, नई उमंग’ असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार काेसळण्याचे भाकीत पत्रकार परिषदेत केले आहे.

पाटील म्हणाले, महाविकास आघाडीला २६ महिने पूर्ण झाले असून आतापर्यंतचे सर्वाधिक पाच दिवसांचे अधिवेशन नुकतेच पार पडले. परंतु आतापर्यंत समाजातील काेणत्याच घटकाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. ३२ हजार काेटींच्या पुरवणी मागण्या मान्य करणे तसेच १९ वेगवेगळी बिले मंजूर करणे इतपतच अधिवेशन चालवण्याचा सरकारचा मनसुबा हाेता. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला नकाे हाेती. विधानसभेचे नियम बदलून आवाजी पद्धतीने निवडणूक घेण्याचा सरकारचा कट हाेता. राज्यपालांना सरकारने पाठवलेले पत्र महाराष्ट्राच्या संस्कृतीला छेद देणारे आणि राज्यपालपदाचा मान न राखणारे हाेते, असा आरोपही त्यांनी या वेळी केला.

बातम्या आणखी आहेत...