आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 वर्षांच्या नातीने आजीला चोरापासून वाचवले:सोनसाखळी चोराला पळवून लावले, ऋत्वीच्या धाडसाचे सर्वत्र होत आहे कौतुक

पुणे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

60 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेला 2 जणांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी 10 वर्षांच्या नातीने समयसूचकता दाखवत चोरांना धक्का दिला. आणि चोरी होता होता राहिली. या मुलीच्या शौर्याचे सर्वत्र मोठे कौतुक होत आहे.

सध्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वृद्धांसोबत तर अशा घटना दररोज होत आहेत. अशाच प्रकारची एक घटना शिवाजी नगर भागात घडली. मात्र यावेळी आपल्या आजीला चोरांपासून वाचवणाऱ्या नातीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

अशी घडली घटना

शिवाजीनगर भागातील मॉडेल कॉलनीमध्ये राहणार्‍या लता वाघ या संध्याकाळी 8 वाजण्याच्या सुमारास दोन नातींसोबत फुटपाथवरून मुलीच्या घरी जात होत्या. त्यावेळी 25 ते 30 वयाचा एक तरुण दुचाकीवरून आला आणि त्याने या आजीला पत्ता विचारला. त्यावर आजी पत्ता सांगत असताना चोरट्याने आजूबाजूला पाहत आजीच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोन्याची चैन हिसकावण्याचा प्रयत्न केला.

घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

लता वाघ यांनी चोर चोर म्हणून ओरडण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांच्यापासून 5 फुटांच्या अंतरावर असलेल्या दहा वर्षीय ऋत्वी वाघ हिने चोराच्या तोंडावर हाताने मारण्यास सुरुवात केली. मात्र चोरट्याने हिसका देऊन तेथून पळ काढला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...