आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा (मविआ) प्रयोग कायम राहिला तर देशातही सत्तांतर अटळ असल्याचा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी (ता. 4) व्यक्त केला. "विरोधी पक्षाचे प्रमुख नेते मविआ सरकार महिना-पंधरा दिवसांत पडेल असा दावा करतात. पण आता भविष्य सांगायचे बंद झाले. अडीच वर्ष हे सरकार टिकले असून 5 वर्षांचा कार्यकाळही पूर्ण करेल. 'मविआ'चा प्रयोग कायम राहिला तर देशातही सत्तांतर होऊ शकते," असे ते म्हणाले. आपण आस्तिक किंवा नास्तिकचा प्रचार करत नसल्याचेही पवार यावेळी म्हणाले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची पुण्यात आज एका कार्यक्रमात प्रगट मुलाखत झाली. या मुलाखतीत विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर पवारांनी सडेतोड उत्तरेही दिली.
काश्मीर फाइल्सद्वारे लक्ष विचलित
शरद पवार म्हणाले, काश्मीर फाइल्स चित्रपटात चुकीच्या पद्धतीने महत्व दाखवून लक्ष विचलित करण्यात आले. त्यावेळी सत्ता कोणाची होती, हे चित्रपटात दाखवले नाही. बृजभूषण कुणी मॅनेज करेल अशी व्यक्ती नाही, असा टोलाही पवारांनी राज ठाकरे यांना दिला. अनेक गोष्टी पुढे येतात, मीडियाही बायस झाला आहे, माध्यमांचे नियंत्रण ताकदवान व्यक्तीच्या हाती आहे. जे योग्य आहे ते योग्य असे माध्यमांनी धोरण अवलंबवायला हवे, असा उल्लेखही पवारांनी केला.
बाळासाहेब असते तर...
संजय राऊतांसारखे स्पष्ट विचार लिहायला हवे असे सांगतानाच पवार म्हणाले की, बाळासाहेब असते तर असे उद्योग करण्याची हिंमत भाजपच्या लोकांत नसती असेही ते म्हणाले.
सध्याचे राजकारणी सभ्य नाही
शरद पवारांना सद्यस्थितीतील राजकारण्यांबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी स्पष्ट केले की, सध्याचे राजकारणी सभ्य, सुसंस्कृत नाहीत. 2024 मध्ये भाजपचे अर्धे नेते पक्ष सोडतील असा दावाही त्यांनी केला.
आम्ही दडपशाहीला घाबरत नाही
पवार म्हणाले, ईडी असो की काहीही. आम्ही दडपशाहीला घाबरत नाही. शिवसेना राजकारणात येण्यापूर्वी एका विचारधारेने चालत होती. त्यानंतरही हा विचार शिवसेनेने सोडला नाही. त्यांचा विचार आजही तितकाच प्रभावी आहे.
म्हणून मी देवासमोर हात जोडतो
पवार म्हणाले, अस्तितकता नास्तिकता अशा तपासण्या झाल्या नाहीत. योग्य नाही, आस्तिक, नास्तिक व्यक्तिगत प्रश्न आहे. मी नास्तिक, आस्तिकतेचा गवगवा कधी करत नाही. पंढरपूरला गेलो तर मी हात जोडतो. कारण सामान्य माणसांची श्रद्धा असते, त्या सामान्य माणसांच्या श्रद्धेचा अनादर होऊ नये म्हणून मी हात जोडतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.