आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजी ब्रिगेडची मागणी:ब्लॉसम पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष व शाळेच्या मुख्याध्यापिकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

पुणे15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात शाळा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी धायरी वडगाव येथील ब्लॉसम पब्लिक स्कूलमधील मुलाचा बसच्या चाकाखाली आल्याने मृत्यू झाला. शाळेच्या हलगर्जी प्रशासनामुळे एका निरपराध मुलाचा जीव गेला. आई-वडिलांचा म्हातारपणीचा आधार गेला. शाळा प्रशासनाने त्या मुलाचा हलगर्जीपणा खून केला असेच निदर्शनास येत आहे. याला सर्वस्वी संस्थापक मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांना जबाबदार धरुन त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी पोलिसांकडे तक्रार देऊन केली.

​​​​​​अर्णव अमोल निकम (वय 12, रा. राजयोग सोसायटी वडगाव खुर्द) याचा शाळेतून बसमधून घरी जाताना चाकाखाली सापडून दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला आहे. त्याच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपयाचा योग्य मोबदला मिळावा. तसेच या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या सर्वांवर गुन्हा दाखल करावा असेही तक्रारीत नमूद आहे.

शिवसेना आमदार तानाजी सावंत यांच्या JSPM संस्था अंतर्गत ब्लॉसम पब्लिक स्कूल असून सदर शाळा जरी या अपघातापासून आपले हात झटकण्याचा प्रयत्न करीत असेल तरी ती स्कूल बस शाळेची होती, यात काही शंका असण्याचे कारण नाही. मुलाच्या आईला मानसिक धक्का बसला असून आतापर्यंत त्याची आई कोमात आहे. मुलाचे वडिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. त्या दोघांची प्रकृती बिघडली आहे. त्यांच्या जीवाला जर काही बरेवाईट झाले त्यास सर्वस्वी शाळेचे संस्थापक मुख्याध्यापक ,तानाजी सावंत व कर्मचारी या सर्वांना जबाबदार धराव अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष अविनाश मोहिते यांनी केली आहे.

शाळेची स्कूल बस लावण्यासाठी शाळेमधून वारंवार फोन येत असतो बस साठी कर्मचारी शाळेचे कर्मचारी अधिकृत फोन करत असतात मग झालेल्या मृत्यूला सुद्धा शाळेचे प्रमुख मुख्याध्यापक आणि कर्मचारी जबाबदार असलेच पाहिजेत. अर्णव हा अवघ्या 12 वर्षाचा मुलगा त्याचा यामध्ये काहीही दोष नसताना शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणाने त्याला त्याचा निष्पाप जीव गमवावा लागला मुलांना शाळेत ने-आण करण्याची जबाबदारी शाळेची असल्यामुळे मुलांना कोणत्याही प्रकारची इजा किंवा अपघात झाल्यास त्यास जबाबदार ती शाळा/संस्था प्रशासन असते. यावेळी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे, महानगराध्यक्ष अविनाश मोहिते, महादेव मातेरे, संघटक शंकर कुटे, प्रमोद धुमाळ आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...