आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी काँग्रेसचा बारामती गड सर करण्यासाठी अर्थमंत्री ‘पुन्हा’ येणार:भाजपकडून बारामती मतदारसंघातील बूथ रचना

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारसंघावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुन्हा एकदा या मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. भाजपने त्यांच्यावर या मतदारसंघाची जबाबदारी साेपवली आहे. तीन महिन्यांपूर्वीच सीतारामन यांनी बारामतीत तीन दिवसांचा दाैरा पूर्ण केला हाेता. आता पुन्हा त्या डिसेंबर महिन्यात तीन दिवसांचा बारामती लाेकसभा करणार असून त्यांच्या दाैऱ्याची पूर्वतयारी करत संघटन बांधणी करण्यासाठी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्याेग आणि जल शक्ती राज्यमंत्री प्रल्हाससिंग पटेल ११ व १२ नाेव्हेंबर राेजी बारामती मतदारसंघाचा दाैरा करणार असल्याची माहिती भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे आणि संघटन सरचिटणीस धर्मेंद्र खांडारे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी राजेंद्र भिंताडे, प्रशांत काेतवाले, जनार्दन दांडगे उपस्थित हाेते. शेवाळे म्हणाले, बारामती लाेकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात केंद्रीय राज्यमंत्री दाैरा करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...