आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज कनेक्शन:नवीन वीज कनेक्शन देण्याच्या बहाण्याने इलेक्ट्रिशियनकडून आर्थिक फसवणूक

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन वीज मीटर कनेक्शन देण्यासाठी चार जणांकडून तब्बल ४६ हजार रुपये घेऊनही वीज कनेक्शन न देणाऱ्या एकावर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार नितीन रमेश नाईक (रा. महात्मा फुले पेठ, स्वारगेट, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रजाक इसाक सय्यद (५७, रा. रा. मोहंमदी हाइट्स, भाग्योदयनगर, कोंढवा बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. नाईकने फिर्यादी रजाक सय्यद, मुनिरा खान, रशिदा महिदा, अबू शेख त्यांच्याकडून वीज मीटर देण्यासाठी ४६ हजार ३०० रुपये घेतले.

बातम्या आणखी आहेत...