आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुन्हा दाखल:प्रकाश आंबेडकर आणि गुणरत्न सदावर्तेंविरोधात साताऱ्यात अदखलपात्र गुन्हा दाखल, दोघांनी राजेंविरोधात केले होते आक्षेपार्ह वक्तव्य

सातारा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुणरत्न सदावर्तेंनी एका वृत्तवाहिनीवर खासदार छत्रपती संभाजीराजेंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.
  • वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी भाजप खासदार उदयनराजे भोसलेंवर जोरदार टीका केली होती.

वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर आणि अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात साताऱ्यामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे या दोघांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. सातारा शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडून प्रकाश आंबेडकर तसेच गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, 'दोन्ही राजांचा मराठा आरक्षणप्रश्न बंदला पाठिंबा असल्याचे वाचनात कुठेही आलेले नाही. एक राजा तर बिनडोक असल्याचे मी म्हणेन, तर दुसरे संभाजी राजे यांनी आरक्षणाबद्दल घेतलेली भूमिका बरोबर आहे. मात्र ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर अधिकभर देत असल्याचे दिसत आहे. ज्या माणसाला राज्य घटना माहिती नाही. ‘आम्हाला आरक्षण मिळाले नाही, तर सर्वांचे आरक्षण रद्द करा’, अशी ते भूमिका मांडतात. त्यावरून त्यांना भाजपने राज्यसभेवर कसे पाठवले? हाच प्रश्न उपस्थित होतो' असा टोला त्यांनी उदयनराजेंना लगावला होता.

गुणरत्न सदावर्तेंचे काय आहे प्रकरण?
मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. याविषयावर बोलताना गुणरत्न सदावर्तेंनी एका वृत्तवाहिनीवर खासदार छत्रपती संभाजीराजेंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यानंतर सकल मराठा क्रांती मोर्चाकडून याचा विरोध करण्यता आला होता. सदावर्तेंचे वक्तव्य अतिशय निंदनीय म्हणत मराठा संघटनेकडून याचा निषेध करण्यता आला होता. यानंतर सकल मराठा समाज आणि करण गायकर यांच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली होती.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser